कंबरेवर वाढलेले फॅट कमी करण्यासाठी कॉफीमध्ये मिक्स करा 'हा' पदार्थ
सकाळी उठल्यानंतर प्रत्येकालाच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफीचे सेवन केल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. पण उपाशी पोटी चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. दूध किंवा पाण्याचा वापर करून बनवलेली कॉफी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. यासोबतच कॉफी प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण नेहमीच कॉफी थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता. कॉफी बनवण्यासाठी लागणारे सर्वच पदार्थ स्वयंपाक घरात उपलब्ध असतात. त्यामुळे कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही कॉफी बनवू शकता. कॉफी प्यायल्यामुळे वाढलेले वजन सुद्धा कमी होण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ब्लॅक कॉफीमध्ये कोणता पदार्थ मिक्स करून प्यायल्यास वजन कमी होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
घरी बनवलेल्या साध्या कॉफीमध्ये तूप मिक्स करून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. ब्लॅक कॉफीमध्ये अर्धा चमचा तूप मिक्स करून प्यायल्यास शरीरात मोठे बदल दिसून येतील. तुपामध्ये हेल्दी फॅट्स आढळून येतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात इतर कोणत्याही पेयांचे सेवन करण्याऐवजी तूप घालून तयार केलेली कॉफी प्यावी. यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि लवकर खाण्याची इच्छा होत नाही.
कॉफीमध्ये ‘फॅट बर्निंग मोड’ घटक आढळून येतात. त्यामुळे उपाशी पोटी कॉफीचे सेवन केल्यास शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी झपाट्याने कमी होते. याशिवाय इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कॉफीचे सेवन करावे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी पोटावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होणे आवश्यक आहे. ब्लॅक कॉफीमध्ये तूप मिक्स करून प्यायल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल.
तुपाचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनशक्ती सुधारते. याशिवाय आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कॉफीमध्ये तूप मिक्स करून प्यावे. वारंवार गॅस, फुगणे किंवा पोट खराब होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. दिवसभरात तुम्ही एक किंवा दोन वेळा कॉफीचे सेवन करू शकता. जास्त कॉफी प्यायल्यास आरोग्याला हानी पोहचते.
लठ्ठपणा म्हणजे काय?
शरीरात चरबीची जास्त प्रमाणात वाढ होणे म्हणजे लठ्ठपणा.हे केवळ वजन वाढणे नसून एक गंभीर आरोग्य स्थिती आहे.
लठ्ठपणाचे धोके:
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग.उच्च कोलेस्टेरॉल.काही प्रकारचे कर्करोग.बालपणात लठ्ठपणा असल्यास अकाली मृत्यू आणि अपंगत्वाचा धोका वाढतो.मानसिक आरोग्य समस्या, जसे की कमी आत्मसन्मान आणि नैराश्य.