Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mouth Ulcer: वारंवार तोंड येतेय का? दुर्लक्ष करू नका; ‘या’ ५ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Frequent Mouth Ulcer Causes: तोंडात अल्सर होणे सामान्य असले तरी ते वारंवार होत असतील किंवा लवकर बरे होत नसतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. यामागची कारणे कोणती, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 07, 2026 | 06:13 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • वारंवार तोंड येतेय का?
  • दुर्लक्ष करू नका
  • ‘या’ ५ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत
अधूनमधून तोंड येणे ही एक सामान्य समस्या आहे. अनेकदा ती काही दिवसांत आपोआप बरी होते. मात्र तुम्हाला वारंवार तोंडात अल्सर होत असेल किंवा बरे होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, तोंडातील अल्सर हे केवळ मसालेदार पदार्थ, तणाव किंवा जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळेच होत नाहीत. तर, कधीकधी गे एखाद्या गंभीर आजाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. वारंवार तोंड येण्यामागे कारणे कोणती, जाणून घ्या.

Hair Spa खरंच केसांसाठी फायदेशीर की फक्त पैशांची उधळण; जाणून घ्या

पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे वाढू शकतो धोका

शरीरातील आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेचा परिणाम अनेकदा सर्वप्रथम तोंड आणि त्वचेवर दिसून येतो. शरीरात व्हिटॅमिन B12, लोह आणि फॉलिक अॅसिडची कमतरता असल्यास तोंडाच्या आतील त्वचा कमकुवत होते. ज्यामुळे वारंवार फोड येण्याची समस्या वाढू शकते. याशिवाय, जिभेला जळजळ होणे, तोंडाच्या चवीत बदल, अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे आणि त्वचा पिवळी पडणे यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात.या कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, दूध, अंडी, मासे आणि सुका मेवा आहारात समाविष्ट करणे उपयुक्त ठरते.

पचनसंस्थेतील विकारही असू शकतात कारण

सीलिअॅक रोग, क्रोहन रोग आणि अल्सरेटिव्ह कोलायटिससारख्या पचनसंस्थेच्या आजारांमुळे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे नीट शोषता येत नाहीत. परिणामी तोंडात अल्सर होऊ शकतात. यासोबत पोटदुखी, अतिसार, गॅस, भूक कमी लागणे आणि वजन कमी होणे अशी लक्षणेही जाणवू शकतात. सेलिॲक डिसीजमध्ये, ग्लूटेन नावाच्या प्रथिनावर शरीराच्या प्रतिक्रियेमुळे लहान आतड्यावर परिणाम होतो. क्रोहन डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस हे असे आजार आहेत ज्यामुळे आतड्यांमध्ये सूज येते.

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यास वाढतो त्रास

जेव्हा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, तेव्हा संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होते. यामुळे तोंडात जिवाणू किंवा विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू शकतो, ज्यामुळे वारंवार तोंडात अल्सर होतातसततचा ताण, अपुरी झोप, अयोग्य आहार किंवा काही औषधांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशा वेळी अल्सर लवकर बरे होत नाहीत आणि पुन्हा पुन्हा उद्भवतात.

मधुमेहाचेही असू शकते लक्षण

जेव्हा रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ नियंत्रणात राहत नाही, तेव्हा शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते. यामुळे तोंडात जिवाणू किंवा बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो, ज्यामुळे अल्सर होते.मधुमेहींना तोंड कोरडे पडणे, हिरड्यांच्या समस्या, वारंवार होणारे संसर्ग आणि जखमा उशिरा भरणे यांसारख्या समस्यांचाही त्रास होऊ शकतो.

ऑटोइम्यून आजार

काही स्वयंप्रतिरोधक रोगांमध्ये, शरीराची रोगप्रतिकार प्रणाली चुकून स्वतःच्याच निरोगी टिश्यूजवर हल्ला करते. अशा परिस्थितीत वारंवार तोंड येण्याची समस्या होऊ शकते. बेसेट सिंड्रोम ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये तोंडात फोड किंवा डोळ्यांखाली सूज येऊ शकते. ल्युपससारख्या आजारांमध्ये, तोंडाच्या आतदेखील फोड येऊ शकतात.

कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

जर अल्सरसोबत तीव्र वेदना, ताप, वारंवार संसर्ग, वजन झपाट्याने कमी होणे अशी लक्षणे दिसत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Analogue Paneer: तुम्हीही खात नाही ना बनावट पनीर? कसे तयार होते; आरोग्यासाठी किती धोकादायक

Web Title: Mouth ulcer causes symptoms serious diseases health news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • diabetes
  • health care news
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

आरोग्यसेवेतील तंत्रज्ञानाचा बदलता चेहरा; वैशिष्ट्यांपासून रुग्णांच्या उपचारांच्या निकालांपर्यंतचा प्रवास
1

आरोग्यसेवेतील तंत्रज्ञानाचा बदलता चेहरा; वैशिष्ट्यांपासून रुग्णांच्या उपचारांच्या निकालांपर्यंतचा प्रवास

उपाशी पोटी कढीपत्ता खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात? पचनक्रिया आणि मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी या पद्धतीने खा कढीपत्ता
2

उपाशी पोटी कढीपत्ता खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात? पचनक्रिया आणि मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी या पद्धतीने खा कढीपत्ता

Food Cravings: सतत काहीतरी खावंस वाटतंय? हा आजार की पोषक तत्त्वांच्या कमतरतेचा इशारा? जाणून घ्या
3

Food Cravings: सतत काहीतरी खावंस वाटतंय? हा आजार की पोषक तत्त्वांच्या कमतरतेचा इशारा? जाणून घ्या

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे शरीराचा सांगाडा झाला आहे? मग आहारात करा ‘या’ पॉवरफुल पदार्थांचे सेवन, थकवा होईल कमी
4

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे शरीराचा सांगाडा झाला आहे? मग आहारात करा ‘या’ पॉवरफुल पदार्थांचे सेवन, थकवा होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.