
जुन्या कपड्यांना नवी दिशा! रिफाइबरची ‘न वापरलेल्या कपड्यांपासून स्वातंत्र्य’ मोहीम, मुंबईतून २.७ टन कपडे जमा
कपड्यांचा कचरा योग्य पद्धतीने हाताळणे आणि त्यांचा पुन्हा वापर करणे हे पर्यावरणपूरक भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने ओटररीच्या माध्यमातून रिफाइबर १५ ऑगस्ट २०२६ रोजी ‘न वापरलेल्या कपड्यांपासून स्वातंत्र्य’ ही विशेष मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिक रिफाइबर ॲपच्या माध्यमातून घरात वापरात नसलेले कपडे पिकअपसाठी बुक करू शकतात. जमा झालेले कपडे पुन्हा वापर, रिसायकलिंग आणि पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जातील. कपड्यांचा अधिक काळ वापर व्हावा आणि त्यांच्या जबाबदार वापराबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढावी, हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम टिसर, भारतातील वस्त्र निर्माता संघ (CMAI), संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना (UNIDO) आणि लायन्स इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने राबवली जात आहे. उद्योग, सरकार, पर्यावरणाशी संबंधित संस्था आणि नागरिकांना एका उपक्रमासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.(फोटो सौजन्य – AI)
आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? उपाशी पोटी ‘या’ पद्धतीने करा आल्याचे सेवन
या ऑनलाइन उपक्रमात महाराष्ट्र सरकारच्या टेक्सटाइल कमिश्नर वृंदा देसाई मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत कपड्यांचा योग्य वापर, पुनर्वापर आणि रिसायकलिंग याबाबत जनजागृती व नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे.रिफाइबरच्या मुंबई टेक्सटाइल सर्क्युलर इकॉनॉमी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टमधून या मोहिमेला दिशा मिळाली. विश्व पर्यावरण दिन २०२६ निमित्त राबवलेल्या या प्रोजेक्टमध्ये २.७ टन वापरलेले कपडे जमा करण्यात आले. २५७ नागरिकांकडून २७५ कलेक्शन ऑर्डर मिळाल्या आणि १५ लॉन्ड्री पार्टनर्सच्या २८ शाखांच्या माध्यमातून त्या पूर्ण करण्यात आल्या. या प्रोजेक्टमधून शहरात आधीपासून उपलब्ध असलेल्या सेवा नेटवर्कचा वापर करून घराघरातून कपडे व्यवस्थित जमा करता येतात, हे स्पष्ट झाले. त्यासाठी स्वतंत्र लॉजिस्टिक्स नेटवर्क उभारण्याची गरज नसल्याचेही यातून दिसून आले.
रिफाइबर इनिशिएटिव्हचे चेअरमन श्री. श्रीकांत भांगडिया म्हणाले, “मुंबईतील प्रोजेक्टमधून कपड्यांचा कचरा अधिक सोप्या आणि व्यवस्थित पद्धतीने मोठ्या प्रमाणावर जमा करण्याचा मार्ग स्पष्ट झाला. नागरिक आणि नेटवर्क पार्टनर्सकडून मिळालेल्या प्रतिसादातून जबाबदारीने कपड्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी लोकांचा सहभाग वाढवण्याची मोठी संधी असल्याचे दिसले. मुंबईतील अनुभवाच्या आधारावर इतर शहरांमध्येही राबवता येईल असे मॉडेल तयार करून देशभर टेक्सटाइल रिसायकलिंग आणि सर्क्युलरिटीला चालना देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘न वापरलेल्या कपड्यांपासून स्वातंत्र्य’ ही त्याच दिशेने महत्त्वाची पायरी आहे.”
ओटररी आणि रिफाइबरचे COO श्री. मनोज वनवारी म्हणाले,“टेक्सटाइल सर्क्युलरिटीसाठी नागरिक, उद्योग, सरकार आणि पर्यावरणाशी संबंधित संस्थांचा एकत्रित सहभाग आवश्यक आहे. मुंबईतील प्रोजेक्टने तंत्रज्ञान आणि उपलब्ध सेवा नेटवर्कच्या मदतीने कपडे व्यवस्थित जमा करता येतात, हे दाखवून दिले. या मोहिमेतून कपडे जमा करण्याची प्रक्रिया नागरिकांसाठी अधिक सोपी करणे आणि त्यांच्या पुनर्वापर व रिसायकलिंगला चालना देणे, हा आमचा उद्देश आहे. मुंबईतील अनुभवाच्या आधारावर देशातील इतर शहरांमध्येही हे मॉडेल राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
मुंबईतील या प्रोजेक्टमधून मिळालेल्या अनुभवाच्या आधारावर रिफाइबर आता हा उपक्रम मोठ्या स्तरावर नेण्याच्या तयारीत आहे. सरकार, उद्योग, पर्यावरणाशी संबंधित संस्था आणि नागरिक यांच्या सहकार्याने संपूर्ण भारतात कपड्यांचा पुनर्वापर, रिसायकलिंग आणि सर्क्युलरिटीला चालना देणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
Ans: न वापरलेले किंवा अतिरिक्त कपडे जमा करून त्यांचा योग्य पुनर्वापर किंवा पुनर्प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे.
Ans: या मोहिमेद्वारे मुंबईतून २.७ टन कपडे जमा करण्यात आले.
Ans: जुन्या कपड्यांचा पुनर्वापर किंवा पुनर्प्रक्रिया केल्याने टेक्स्टाइल कचरा कमी करण्यास आणि संसाधनांचा अधिक शाश्वत वापर करण्यास मदत होऊ शकते.