युरिन लीकेज का होते आणि काय आहेत याचे परिणाम
काही अशा महिला आहेत, ज्यांना शारीरीक संबंध अथवा इंटरकोर्सदरम्यान लघ्वी बाहेर येण्याचा त्रास होतो. तर काही महिलांना केवळ संभोगाच्या वेळीच नाही नुसत्या फोरप्ले दरम्यानदेखील urine leakage चा त्रास होऊ शकतो. हे नक्कीच नॉर्मल नाहीये. सामान्यतः असा त्रास शारीरिक संबंधादरम्यान होत नाही. पण असा त्रास ज्या स्त्री ला होत आहे तिने अजिबात दुर्लक्ष करू नये कारण ही गोष्ट नैसर्गिक नाही हे वेळीच लक्षात घ्यावे.
शारीरिक संबंधादरम्यान युरिन लीकेज नक्की का होते? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर विद्या नर्सिंग होमच्या ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. नीरज शर्मा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी शारीरिक संबंधादरम्यान युरिन लीकेजचे कारण सांगत काही गोष्टी टाळाव्यात असेही सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock)
स्ट्रेस युरिनरी इन्कॉन्टिनेस
शारीरिक संबंधादरम्यान लघ्वी होण्याचे कारण
जेव्हा महिलांचे पेल्विक फ्लोअरच्या मांसपेशी कमकुवत होतात तेव्हा अशा स्थितीमध्ये युरिनरी इन्कॉन्टिनेसचा सामना करावा लागतो. शारीरिक संबंधाच्या स्टिम्युलेशनमुळे ब्लॅडर अथा युरेथ्रावर ताण येतो आणि जर तुम्हाला पहिल्यापासूनच युरिनरी इन्कॉन्टिनेस समस्या असेल तर शारीरिक संबंधादरम्यान, जास्त हसल्यावर वा शिंकल्यावर लघ्वी होण्याचा त्रास होऊ शकतो.
हेदेखील वाचा – वयानुसार दर महिन्यात किती वेळा ठेवावे शारीरिक संबंध? धक्कादायक आकडे अहवालातून समोर
बद्धकोष्ठता
बद्धकोष्ठता किती ठरते त्रासदायक
बद्धकोष्ठता ही हल्ली वाढलेली समस्या आहे. शौचाला कडक होत असल्यामुळे आपल्या नसांवर ताण येतो. अशा स्थितीमध्ये लघ्वी होणे हे साहजिकच आहे. मात्र अनेक महिलांना बद्धकोष्ठतेमुळेही हा त्रास होत चाललेला दिसून येत आहे.
अल्कोहोल वा कॅफिन सेवन
दारू आणि कॅफिनचा कसा होतो परिणाम
एखाद्या महिलेने शारीरिक संबंधापूर्वी जर अति मद्यप्राशन केले असेल अथवा तिने जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केले असेल तर लघ्वी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. बेवरेजेस ड्युरेटिक असतात जे लघ्वी पास करतात आणि ज्यामुळे युरिन लीकेज होते वा आपण लघ्वी थांबवू शकत नाही.
ओव्हर अॅक्टिव्ह ब्लॅडर
ओव्हर अॅक्टिव्ह ब्लॅडरमुळे अचानक लघ्वीला जावेसे वाटते ज्यामुळे सतत बाथरूमच्या फेऱ्या माराव्या लागतात. तुम्ही जर 24 तासात 8-9 वेळा लघ्वीला जात असाल तर तुम्हाला ओव्हर अॅक्टिव्ह ब्लॅडरचा त्रास आहे हे समजून जावे. यादरम्यान तुम्ही जर शारीरिक संबंध ठेवत असाल तर अचानक लघ्वी लीकेज होण्याचा त्रास होऊ शकतो.
हेदेखील वाचा – सकाळीच शारीरिक संबंध ठेवाल तर मिळतील कमालीचे फायदे, रिसर्चमध्ये खुलासा
कशी काळजी घ्यावी
कोणत्या गोष्टी जपाव्यात
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.