
Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी
Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी
चांदीपुरमध्ये समुद्राचे पाणी इतके मागे का सरकते?
यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे चांदीपुरच्या समुद्रकिनाऱ्याची बनावट. इथे समुद्रतळ बऱ्याच अंतरापर्यंत उथळ आणि तुलनेने सपाट आहे. अशात भरतीच्या वेळी सामान्य समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत समुद्राचे मागे सरकणे इथे स्पष्टपणे दिसून येते. याच वैशिष्ट्यामुळे चांदीपुरमधील समुद्राचे पाणी कधी किनाऱ्यावर दिसते तर कधी किनाऱ्यापासून फार लांब थांबलेले नजरेस पडते. म्हणूनच इथे पाणी गायब होत नाही तर ओहोटीवेळी ते काही अंतर दूर मागे सरकते ज्यामुळे किनाऱ्यावर ते दिसेनासे होते.
समुद्राचे पानी नक्की जाते कुठे?
चांदीपुरमधील समुद्राचे असे मागे हटणे काही रहस्य किंवा चमत्कार नाही तर यामागे भरती-ओहोटीच्या नैसर्गिक प्रक्रियेचा होणारा परिणाम कारणीभूत आहे. जेव्हा ओहोटी येते, तेव्हा समुद्राचे पाणी हळूहळू किनाऱ्यापासून मागे सरकते. चांदीपूरमधील भाैगोलिक रचनेमुळे पाणी बरेच लांब मागे हटते. मग यानंतर जेव्हा भरती येते तेव्हा पाणी पुन्हा किनाऱ्याजवळ येते. भरती-ओहोटीमधील हा बदल दिवसातून दोनदा समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळतो. म्हणजेच जर तुम्ही या दोन वेळेत समुद्रकिनाऱ्याला भेट दिलीत तर तुम्हालाही निसर्गाचा हा अनोखा चमत्कार पाहायला मिळेल.
Travel Tips: युद्धात कधीच पराभूत न झालेला भारतातील एकमेव किल्ला! जाणून घ्या या दुर्गाची रंजक कहाणी
पानी मागे सरकल्यानंतर दृष्यात होतो बदल
चांदीपुरमध्ये जेव्हा समुद्र मागे सरकतो तेव्हा समुद्रकिनाऱ्याचे पूर्ण रुप पालटते. पाण्याच्या लहरींऐवजी फक्त ओली मृदा दिसून येते. समुद्रखालील तो भाग यावेळी स्पष्टपणे दिसून येतो जो अधिकतरवेळी समद्राच्या खाली लपलेला असतो. यावेळी पर्यटक इथे तासनतास चालतात आणि या क्षणांचा आनंद लुटतात. भरती-ओहोटीमुळे वाळूवर तयार झालेले विविध नमुनेही पाहणे यावेळी रंजक ठरते. समुद्राचे पाणी इथे फक्त काही काळंच ओसरते मग थोड्या वेळाने हे पाणी पुन्हा समुद्रकिनारी जमा होते. यावेळी किनाऱ्यावर नक्की कोणते बदल घडून येतात ते तुम्ही चांदीपुरला जाऊन पाहू शकता.