Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला दिनी फोर्टिस हॉस्पिटलच्या महिला डॉक्‍टरांनी जीवघेण्या वैद्यकीय आणीबाणीत वाचवले प्रवाशाचे प्राण

आंतरराष्‍ट्रीय महिला दिन 2025 रोज तीन महिलांनी जीवघेण्या आणीबाणीच्या काळात जबाबदारी स्वीकारली आणि स्‍त्रीशक्‍तीची भावना खऱ्या अर्थाने दाखवून दिली, तसेच व्‍यक्‍तीचा जीव वाचवण्याचे अपवादात्मक धैर्य आणि कौशल्य दाखवले.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 11, 2025 | 03:35 PM
फोर्टिस हॉस्पिटलच्या महिला डॉक्‍टरांनी जीवघेण्या वैद्यकीय आणीबाणीत वाचवले प्रवाशाचे प्राण

फोर्टिस हॉस्पिटलच्या महिला डॉक्‍टरांनी जीवघेण्या वैद्यकीय आणीबाणीत वाचवले प्रवाशाचे प्राण

Follow Us
Close
Follow Us:

फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथील वैद्यकीय तज्ञांच्‍या टीममधील वरिष्‍ठ मोहिनी चंद्रशेखर (प्रमुख नर्सिंग अधिकारी), डॉ. प्रियांका काळे (समन्‍वयक-वैद्यकीय सेवा) आणि पूनम कनस्कर (प्रमुख-क्‍वॉलिटी) 8मार्च 2025 रोजी फोर्टिसच्या मेडिकल स्‍ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्स ग्रुप (एमएसओजी) कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर इंडिगोच्या विमानाने दिल्लीहून मुंबईला परतत होते. उड्डाणानंतर जवळपास 15ते 20 मिनिटांनी केबिन क्रूने वैद्यकीय आणीबाणीमुळे उपलब्ध असलेल्या कोणत्याही डॉक्टर किंवा नर्सकडून त्वरित मदत मागितली. कोणताही संकोच न करता डॉ. प्रियांका काळे, मोहिनी चंद्रशेखर आणि पूनम कनस्कर यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घेतला.

आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल! हार्ट अटॅक स्ट्रोकसाठी ‘या’ देशात तयार केली जाणार लस, शास्त्रद्यांनी केला दावा

फ्लाइटमधून प्रवास करणारा मध्यमवयीन पुरुष प्रवासी अचानक बेशुद्ध झाला होता. तो जवळपास प्रतिसाद देत नव्हता, त्याला खूप घाम येत होता आणि त्याची नाडी खूप कमकुवत होती. त्‍याला गंभीर हायपोग्लायसेमिक शॉक आल्याचे दिसून आले, ज्यामुळे नाडीचा दर धोकादायकपणे कमी झाला होता. रुग्णाशी संवाद साधल्यानंतर (तो जेमतेम प्रतिक्रिया देऊ शकला) त्यांना कळले की, त्याला मधुमेह आहे. तात्काळ धोका लक्षात येताच टीमने त्‍वरित उपचार सुरू केले. त्यांनी त्याच्या तोंडात साखर ओतली आणि ती विरघळेपर्यंत निरीक्षण केले. पुढील 5 ते  6 मिनिटांत त्यांनी ही प्रक्रिया पुन्हा केली, 1 ते 2 मिनिटांच्या अंतराने अधिक साखर दिली.

चौथ्या सॅशेनंतर प्रवासी हळूहळू शुद्धीवर आला आणि तो टीमला प्रतिसाद देऊ लागला. त्‍याची प्रकृती स्थिर झाली आणि तो संवाद साधू शकला. आभार मानत तो म्‍हणाला की, सकाळपासून काहीही न खाल्ल्यामुळे त्‍याला चक्‍कर आली असावी. वैद्यकीय टीमच्‍या सल्ल्यानुसार केबिन क्रूने त्याला नाश्ता आणि ज्यूस दिला, ज्‍यामुळे त्‍याची प्रकृती अधिक स्थिर झाली. उर्वरित प्रवास कोणत्याही अडचणीशिवाय सुरू राहिला आणि रुग्ण इतर प्रवाशांसह मुंबईत सुरक्षितपणे उतरला.

या तज्ञ वैद्यकीय टीमच्या जलद आणि निर्णायक कृती प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला नसता, तर प्रवाशाच्या गंभीर हायपोग्लाइसेमियामुळे घातक परिणाम झाले असते. विमानात 30,000 फूट उंचीवर असताना देखील टीमने वेळेवर दिलेल्‍या प्रतिसादामधून गंभीर परिस्थितीत वैद्यकीय तज्ञांचे महत्त्व दिसून येते.

लघवीच्या रंगात बदल जाणवतोय? किडनी संसर्ग झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे

फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथील वैद्यकीय सेवांच्‍या समन्‍वयक डॉ. प्रियंका काळे आणि प्रमुख नर्सिंग अधिकारी श्रीमती मोहिनी चंद्रशेखर म्‍हणाल्‍या, ”वैद्यकीय व्यावसायिक म्हणून लोकांचे जीवन वाचवणे आणि हॉस्पिटलबाहेर देखील वैद्यकीय मदत पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. या घटनेमधून कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीयदृष्ट्या सुसज्‍ज राहण्याचे महत्त्व दिसून येते. तीव्र हायपोग्लायसेमिया ही अशीच एक स्थिती आहे, जी झपाट्याने बिकट होऊ शकते आणि जीवघेणी परिस्थिती निर्माण करू शकते. पुढील गुंतागूंत टाळण्यासाठी त्वरित उपचार आणि साखरेच्या पातळीचे नियमन आवश्यक आहे. मी माझ्या टीम सदस्यांचे आणि केबिन कर्मचाऱ्यांचे त्यांच्या मदतीबद्दल आभार व्‍यक्‍त करते. सामूहिक प्रयत्‍नांसह आम्ही आकाशात 30,000 फूट उंचीवर असताना देखील प्रवाशाचे प्राण वाचवण्यात यशस्वी झालो.”

Web Title: On womens day female doctors from fortis hospital saved the life of a passenger in a life threatening medical emergency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • diabetes
  • Doctor advice
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
1

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
2

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी
3

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी
4

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.