तुम्ही जर दिवाळी निमित्त घरी पार्टी किंवा फराळाचे आयोजन करण्याच्या विचारात असाल, तर या खबरदाऱ्या तुम्ही घेतल्याच पाहिजे. सध्या कोरोनाचा सवाट नसले तरी कोरोना बदल आपण नेहमीच काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे सण उत्सव हे काही निर्बंधात साजरे केले जात असत, तब्बल तीन वर्षीनी एपल्या सण हे निर्बंध मुक्त साजरी करता येणार आहे. जर तुम्ही कोणत्या पर्टिच आयोजन केल असेल तर खालीली गोष्टी वाचा…
कोविड १९ संसर्गजन्य आजार आहे. खोकलणे किंवा बोलल्याने देखील ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते. त्यामुळे दिवाळीच्या पार्टीमध्ये कमीत कमी लोकांना आमंत्रित करावे, याने कोरोना संसर्गाचा धोका कमी होऊ शकते.
दिवाळी ही सर्वांसोबत साजरी करण्यात मजा येते. मात्र तुम्हाला जर कोविड १९ ची लक्षणे जाणवत असतील तर सर्वांसोबत दिवाळी साजरा न करता तुम्ही व्हर्च्युअल पद्धतीने दिवाळी साजरी करा. खोकला, ताप, छातीत वेदना, ऐकण्यात समस्या आणि वास बदलणे अशी लक्षणे दिसत असतील तर सर्वांना प्रत्यक्ष न भेटता त्यांच्यासोबत व्हर्च्युअल पद्धतीने दिवाळी साजरी करा.
कोविडापासून सुरक्षा देण्यात मास्क फायदेशीर ठरू शकते. तुम्ही घरी पार्टीचे आयोजन केले असेल किंवा इतरांकडील पार्टीत जाण्याच्या बेतात असाल तर मास्क लावा. मास्क तुम्हाला कोरोनापासून सुरक्षा देऊ शकतो.
घरी पार्टीचे आयोजन केल्यास सॅनिटायझर वापरणे विसरू नका. हात धुताना साबणीचा वापर करा. स्वच्छ हात धुवा. याने कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होऊ शकते.
पार्टी असो किंवा इतर सोहळे, जेवण चांगले असायला हवे अशी अनेकांची आशा असते. मात्र, जेवणामुळे देखील कोरोना विषाणू पसरू शकते. पार्टीमध्य बुफे पद्धत वापरण्याऐवजी प्रत्येकाला वाढण करा. याने संसर्ग वाढीला आळा बसू शकतो.






