जेवणासोबत दही खायला अनेकांना आवडतं. परंतु रात्री दही खाण्याबाबत अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात. काही जणांना रात्री दही खाणे आरोग्यासाठी चांगले वाटते. पण काही जण ते टाळावे असे सांगतात. नेमके काय योग्य आहे? रात्री दही खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात?
रात्री दही खावे की टाळावे? जाणून घ्या

रात्री दहीभात किंवा त्याला जर थोडं फोडणी दिलेली असेल तर अशा स्वरूपामध्ये खाऊ शकता. ज्या लोकांना अस्थमा किंवा सर्दीचा त्रास आहे अशांनी रात्रीचे दही खाणे टाळावे

दह्यामध्ये फॅट्स किंवा प्रोटीन्स आहेत ते रात्री पचायला अवघड आहेत. त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळी दह्याऐवजी ताक घेऊ शकता. कारण ते पचायला हलके आहे. त्यासोबतच तुम्ही कढी किंवा रायता देखील घेऊ शकता. रात्री जर तुम्हाला दही खायचे असेल आणि जर ते तुमच्या तब्येतीला सूट होत असेल तरच तुम्ही खावे.

पण दही खाताना एक गोष्ट आवश्यक लक्षात घ्यावी. ती म्हणजे घरी केलेले ताजे फ्रेश दही असावे जास्त आंबट दही खाऊ नका आणि पॅकेजिंग मधले दही खाणे तुम्ही टाळा,

आयुर्वेद आणि तज्ज्ञांनुसार, दही जड आणि थंड असते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी शरीरात कफ, सर्दी किंवा खोकला होण्याची शक्यता वाढते

आयुर्वेद आणि तज्ज्ञांनुसार, दही जड आणि थंड असते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी शरीरात कफ, सर्दी किंवा खोकला होण्याची शक्यता वाढते






