Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: देशात ५ वर्षांत २.९४ लाखांहून अधिक एड्‌सग्रस्तांचा मृत्यू! महाराष्ट्राची स्थिती सुधारली,पण मुंबईची चिंताजनक

देशभरात विविध कारणांमुळे मागील ५ वर्षांमध्ये तब्बल २ लाख ९४ हजार एडसग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण कालावधीत एकूण मृत्यूंच्या बाबतीत महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असून राज्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र दिसून आले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2026 | 12:00 PM
देशात ५ वर्षांत २.९४ लाखांहून अधिक एड्‌सग्रस्तांचा मृत्यू! महाराष्ट्राची स्थिती सुधारली,पण मुंबईची चिंताजनक

देशात ५ वर्षांत २.९४ लाखांहून अधिक एड्‌सग्रस्तांचा मृत्यू! महाराष्ट्राची स्थिती सुधारली,पण मुंबईची चिंताजनक

Follow Us
Follow Us:

देशभरात राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेकडे नोंदणीकृत असलेल्या आणि एआरटी केंद्रांमध्ये उपचार घेत असलेल्या एचआयव्ही ग्रस्त रुग्णांच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक आणि डोळे उघडणारी आकडेवारी माहिती अधिकारातून समोर आली आहे. गेल्या ५ आर्थिक वर्षात (२०२१ ते २०२६) देशात विविध कारणांमुळे तब्बल २ लाख ९४ हजार एडसग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण कालावधीत एकूण मृत्यूंच्या बाबतीत महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असून राज्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी याबाबत राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेकडे माहिती मागवली. त्यानुसार ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.(फोटो सौजन्य – istock)

पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा थर झपाट्याने होईल कमी! उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, राहाल कायमच निरोगी

या संपूर्ण पाच वर्षांच्या कालावधीत (२०२१-२०२६) झालेल्या एकूण मृत्यूंचा विचार केला तर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे। महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षांत एकूण ३६,६२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जर यामध्ये ‘मुंबई’ची आकडेवारी स्वतंत्र न धरता राज्यासोबत जोडली, तर हा एकूण आकडा ४२,२१६ वर पोहोचतो, जो देशाला हादरवून सोडणारा आहे.

मुंबईत काय स्थिती आहे ?

अहवालात मुंबईची आकडेवारी स्वतंत्रपणे मांडण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एचआयव्ही ग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सातत्याने सुरूच आहे. गेल्या ५ वर्षांत मुंबईत एकूण ५,५९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये मृत्यूची संख्या घटत असताना, मुंबईत मात्र गेल्या दोन वर्षांत मृत्यूचा आलेख पुन्हा वाढला आहे, जी अत्यंत चिंतेची बाब आहे.

मृत्यू सर्व कारणांमुळे:

माहिती अधिकारात ‘नॅको’ने स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडे केवळ एचआयव्ही-ए मुळेच किती मृत्यू झाले, याची अचूक वेगळी आकडेवारी उपलब्ध नाही. ही दिलेली आकडेवारी एआरटी केंद्रांमध्ये नोंदणीकृत असलेल्या अशा एचआयव्ही बाधित रुग्णांची आहे, ज्यांचा मृत्यू अपघातासह इतर कोणत्याही आजार किंवा सर्व प्रकारच्या कारणांमुळे झाला आहे.

Blood Donation: रक्तदान करण्यासाठी तुम्ही फिट आहात का? जाणून घ्या आरोग्याचे महत्त्वाचे नियम

एड्स झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

तीव्र ताप आणि थंडी वाजणे.
घसा खवखवणे आणि डोकेदुखी.
अंगावर लाल पुरळ उठणे.
अतिशय थकवा जाणवणे.
मान, बगल आणि मांडीच्या जागी लिम्फ नोड्स सुजणे

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: HIV आणि AIDS मध्ये काय फरक आहे?

    Ans: HIV हा एक विषाणू आहे जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो. HIV संसर्गाची स्थिती गंभीर झाल्यावर AIDS होऊ शकतो.

  • Que: HIV संसर्ग कसा पसरतो?

    Ans: HIV प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमित रक्त, वापरलेल्या सुई किंवा संक्रमित आईकडून बाळाकडे (गर्भधारणेदरम्यान/प्रसूतीवेळी/स्तनपानातून) पसरू शकतो.

  • Que: HIV झाल्यानंतर सामान्य जीवन जगता येते का?

    Ans: होय, योग्य वेळी निदान आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास HIV असलेली व्यक्ती दीर्घकाळ निरोगी जीवन जगू शकते.

Web Title: Over 2 94 lakh aids related deaths reported in india in 5 years maharashtra improves but mumbai remains a concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • AIDS
  • Health Updates
  • maharashtra

संबंधित बातम्या

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
1

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
2

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?
3

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.