फॅटी लिव्हरचा होणारा त्रास
यकृत हा शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे ज्याचे मुख्य कार्य अन्न आणि औषधांवर प्रक्रिया करणे तसेच रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकणे आहे. आपल्या आरोग्यासाठी या अवयवाचे योग्य प्रकारे कार्य करणे महत्त्वाचे आहे, अन्यथा अनेक समस्या उद्भवू शकतात. असे अनेक रोग आहेत जे यकृताच्या कार्यावर विपरित परिणाम करतात. यामध्ये हिपॅटायटीस, सिरोसिस, लिव्हर कॅन्सर, लिव्हर फेल्युअर, गॅलस्टोन तसेच फॅटी लिव्हर डिसीज यांचा समावेश होतो.
फॅटी लिव्हर आजारामुळे जगभरात अनेक लोकांना त्याचा बळी पडत आहे, भारतात हा आजार दरवर्षी सुमारे 10 दशलक्ष लोकांना प्रभावित करतो. ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते. साधारणपणे फॅटी लिव्हर रोगाचे दोन प्रकार असतात, अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक. चला जाणून घेऊया डॉ. उदय प्रताप सिंह यांच्याकडून आपल्या कोणत्या सवयी ज्यामुळे हा त्रास वाढतो (फोटो सौजन्य – iStock)
दारू पिण्याची सवय
दारू पिण्यामुळे फॅटी लिव्हरवर परिणाम
जर तुम्ही फॅटी लिव्हरचे बळी असाल तर तुम्ही दारू पिण्याची सवय पूर्णपणे सोडून द्यावी, हे केवळ एक सामाजिकदृष्ट्या वाईट मानले जाते आणि इतकेच नाही तर इतर अनेक समस्यांचे मूळ मानले जाते. आजकाल तरूणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण दारूच्या व्यसनाला बळी पडले आहेत, त्यामुळेच फॅटी लिव्हरची समस्या गंभीर बनत चालली आहे
हेल्दी फॅट्स खा
हेल्दी फॅटी पदार्थ खावेत
जेव्हा आपण चिप्स, रेड मीट, फ्रेंच फ्राईज किंवा कोणताही हाय फॅट आहार घेतो तेव्हा फॅटी लिव्हरची समस्या वाढते यात शंका नाही, पण हे टाळण्यासाठी फॅट पूर्णपणे सोडून देणे योग्य नाही. आहारतज्ञांनी सांगितलेल्या प्रमाणानुसार तुम्ही निरोगी चरबीचे सेवन केले पाहिजे. हेल्दी फॅट्स आहारात असण्याची गरज आहे.
कोल्ड्रिंक्स टाळा
कोल्ड्रिंक वा तत्सम पेय टाळावीत
उन्हाळ्यात आराम मिळण्यासाठी आपण अनेक पेये पितो ज्यामध्ये भरपूर साखर असते. आजकाल तरूण वयोगटातील लोक खूप कोल्ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे पितात. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे फॅटी लिव्हर होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे तुम्ही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा पाण्याचे सेवन करणे अधिक योग्य ठरते.
हेदेखील वाचा – फॅटी लिव्हरमुळे चेहरा खराब झाला आहे? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वचेची घ्या काळजी
जंक फूड
फास्ट फूड आणि जंक फूड खाणे टाळावे
याशिवाय तुम्ही फास्ट फूड वा जंक फूडचे अतिसेवन करत असाल तर त्याकडे वेळीच लक्ष द्या. प्रमाणापेक्षा अधिक जंक फूड आणि फास्ट फूड खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच त्रासदायक ठरू शकते. फॅटी लिव्हरची समस्या यामुळे कमी वयात वाढताना दिसून येते आणि त्रासही होतो. त्यामुळे ही सवय वेळीच सोडून द्या
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.