Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पनीर की अंडा भुर्जी? दोघांमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? फरक जाणून घ्या

Paneer Bhurji VS Egg Bhurji : सकाळच्या नाश्तायासाठी पनीर किंवा अंडा भुर्जीचे सेवन आरोग्यासाठी एक पाैष्टिक पर्याय ठरतो. दोन्ही सारखे वाटत असले तरी यातील पोषक घटकांत काहीसा फरक आहे. आपली हेल्थ आणि डाएट पाहता योग्य पदार्थाची निवड आरोग्यासाठी जास्त फायद्याची ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2026 | 08:15 PM
पनीर की अंडा भुर्जी? दोघांमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? फरक जाणून घ्या

पनीर की अंडा भुर्जी? दोघांमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? फरक जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • नाश्त्यात लोकप्रिय असलेल्या दोन प्रोटीनयुक्त पर्यायांपैकी तुमच्यासाठी योग्य कोणता, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
  • पोषणमूल्य, पचनक्षमता आणि फिटनेसच्या उद्दिष्टांनुसार या पदार्थांचे फायदे वेगवेगळे आहेत.
  • तुमची जीवनशैली, आहारपद्धती आणि आरोग्याच्या गरजांनुसार योग्य पर्याय निवडल्यास अधिक लाभ मिळू शकतो.
सकळच्या नाश्त्यासाठी भुर्जी हा प्रकार खूप फेमस आहे. हा पदार्थ फार झटपट तयार होतो आणि चवीलाही फार चांगला लागतो. यासोबत आरोग्यासाठीही भुर्जीचे सेवन चांगलेच फायद्याचे ठरते. भुर्जी ही दोन पदार्थांपासून बनवली जाते. एक म्हणजे अंडा भुर्जी तर दुसरी म्हणजे पनीर भुर्जी. तुम्ही आजवर दोन्ही भुर्जींची चव चाखली असेल पण आरोग्यासाठी कोणत्या भुर्जीचे सेवन अधिक फायद्याचे ठरते ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. आपले शरीर, लाईफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या सवयींनुसार आपण काय खातो याचा शरीरावर परिणाम होत असतो. चला पनीर आणि अंडा भुर्जीतील फरकाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Travel : दोन भावांनी नोकरी सोडून बनवला मातीचा आलिशान विला, हजारो पैसे घालवून लोक येतात राहायला; कुठे आहे ते जाणून घ्या

पोषण

अंडा भुर्जी
अंडा प्रोटीनचा संपूर्ण स्त्रोत आहे. यात अमीनो एसिड आढळून येते. एका अंड्यात साधारणत: ६-७ ग्रॅम इतके प्रोटीन, व्हिटॅमिन B१२, व्हिटॅमिन D आणि कोलीन असते. हे घटक मेंदूच्या विकासात आणि स्नायूंना दुरुस्त करण्यात मदत करतात.

पनीर भुर्जी
पनीरमध्येही प्रोटीनचा चांगला स्त्रोत आढळतो. यात कॅल्शिमचे प्रमाण भरपूर असते जे दातांसाठी आणि हाडांसाठी फायदेशीर ठरते. १०० ग्रॅम पनीरमध्ये साधारण १८-२० ग्रॅम प्रोटीनचा साठा आढळून येतो. याचबरोबर पनीरमध्ये अंड्याच्या तुलनेत चरबीचे प्रमाण कमी असते.

वजन आणि फिटनेससाठी

अंडा भुर्जी
कमी कॅलरी आणि भरपूर प्रोटीनचा साठा असल्याने वजन कमी करण्यासाठी अंडा भुर्जीचे सेवन फायद्याचे ठरते.

पनीर भुर्जी
यात प्रोटीनसोबतच चरबीचे प्रमाण अधिक असल्याने बाॅडी बिल्डिंग किंवा ज्यांना आपलं वजन वाढवायचं आहे अशा लोकांसाठी याचे सेवन फायद्याचे ठरते.

पचन आणि आरोग्य

अंडा भुर्जी
अंड शरीरात सहज पचले जाते आणि यातील पोषक घटक शरीरात लवकर शोषले देखील जाते.

पनीर भुर्जी
काहींना याचे सेवन हेवी वाटू शकते. विशेषत: ज्यांना पचनाच्या समस्या आहेत किंवा जे लॅक्टोज इन्टॉलरेंस आहेत अशांनी पनीरचे सेवन कमी करावे.

चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास ग्लो येतो का? जाणून घ्या चेहऱ्यावर बर्फ लावण्याची योग्य पद्धत आणि त्वचेला होणारे फायदे

शाकाहारी vs मांसाहारी

अंडा भुर्जी
जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी अंडा भुर्जी हा संतुलित आणि हलका पर्याय ठरेल.

पनीर भुर्जी
जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी पनीर भुर्जीचा पर्याय निवडावा.

हृदय आणि कोलेस्ट्राॅलवर परिणाम

अंडा भुर्जी
अंड्याचे सेवन पूर्वी कोलेस्ट्राॅलसाठी पूर्वी चिंतेचा विषय मानला जायचा पण याचे मर्यादित सेवन आरोग्यासाठी सुरक्षित ठरते.

पनीर भुर्जी
पनीरमध्ये सॅच्यूरेचेड फॅट जास्त असते, यामुळे हृदयाच्या समस्या असणाऱ्या रुग्णांनी याचे सेवन मर्यादेत करावे.

 

Web Title: Paneer bhurji vs egg bhurji which is healthier for breakfast protein nutrition weight loss fitness benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Egg
  • Health Tips
  • lifestyle news
  • paneer

संबंधित बातम्या

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
1

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर
2

आनंदी आणि तणावमुक्त जीवनाचं सीक्रेट; जपानी जीवनशैलीच्या ६ सवयी ठरतीय फायदेशीर

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर
3

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत
4

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.