दोन भावांनी नोकरी सोडून बनवला मातीचा आलिशान विला
एका आलिशान विलामध्ये राहाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही आजवर अनेक विला पाहिले असतील किंवा त्यात वेळ घालवला असेल पण आज आम्ही तुम्हाला एका अशा विलाची माहिती देत आहोत जो पूर्णपणे मातीपासून तयार करण्यात आला आहे. इथे पारंपारिक आणि आधुनिक रचनेचा अनोखा संगम पाहता येतो. मुख्य म्हणजे याचे फोटोज इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की पाहून कुणालाही इथे राहण्याचा मोह आवरता येणार नाही. तुम्हालाही गर्दीपासून दूर जर कुठे शांत ठिकाणी कुटुंबासोबत मोकळा वेळ घालवायचा असेल तर या विलाची निवड तुम्ही नक्कीच करु शकता.
कसा बनवला विला?
माहितीनुसार, कोविडच्या काळात या भावांच्या मनात बिजनेसची आयडिया जागली आणि काही तरी वेगळ करण्याच्या विचाराने त्यांनी मातीचा विला तयार करण्याचा निर्णय घेतला. गवत, माती आणि दगडापासून याला तयार करण्यात आले आहे. एखाद्या परिकथेतील वाटणारा विला इतका सुंदर आहे की इथून पुन्हा जाण्याची इच्छाच होत नाही.
View this post on Instagram
कुठे आहे हा विला?
दोन्ही भावांनी हा विला तयार करण्यासाठी ऋषिकेश या ठिकाणाची निवड केली. ऋषिकेशला विमान, रेल्वे तसेच रस्ते मार्गावरुन जाता येते. नवी मुंबईपासून याचे अंतर १,३५० किमी आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर ऐतिहासिकरित्या फार लोकप्रिय आहे. हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जिथे नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते. मागील काही काळापासून हे ठिकाण कॅफे, कार्पोरेट आणि वेलनेस स्ट्रीटचे हब बनले आहे, बहुधा हेच कारण आहे की दोन्ही भावांनी आपल्या विलासाठी या ठिकाणाची निवड केली.
राहण्यासाठी किती खर्च येतो?
माहितीनुसार, हे घर तयार करण्यासाठी भावांनी एकूण २८ ते ३० लाख रुपये खर्च केले. इथे २ बेडरुम आणि एक वाॅशरुम आहे. इथे राहण्यासाठी पर्यटकांना प्रत्येक रात्रीच्या हिशोबाने साधरण १३ ते १४ हजार रुपये खर्च करावे लागतात.






