Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 महिन्यांपूर्वीच गरोदरपणाची बातमी शेअर करण्याची घाई नको! ‘या’ २ चाचण्या महत्त्वाच्या, तज्ज्ञ काय सांगतात?

गरोदरपणाची आनंदाची बातमी लगेच सार्वजनिक न करता किमान पाच महिने थांबण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. राजस्थानमधील Dr. Kirti Sharma यांच्या मते, गर्भधारणा जाहीर करण्यापूर्वी NT स्कॅन आणि अॅनोमली स्कॅन या चाचण्या करणे आवश्यक आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 27, 2026 | 06:54 PM
Dr. Kirti Sharma

Dr. Kirti Sharma

Follow Us
Close
Follow Us:
  • 5 महिन्यांपूर्वीच गरोदरपणाची बातमी शेअर करण्याची घाई नको!
  • कोणत्या चाचण्या करण्याची गरज
  • 5 महिन्यांनंतर गरोदरपणाची बातमी सांगण्याचे फायदे
When To Share Pregnancy News: लग्न आयुष्यातला सुंदर टप्पा मानला जातो. त्यानंतर प्रतिक्षा असते ती पुढच्या सुंदर टप्प्याची संतती सुखाची. कुटुंबातील प्रत्येकजण नवीन पाहुण्याच्या आगमनाच्या बातमीची वाट पाहत असतो. यासगळ्यात जोडप्यावर वेगळाच दबाव असतो. गरोदरपणाच्या काळात स्त्रीवर खूप दबाव येतो. परंतु या काळात शहाणपणाने वागले पाहिजे. गर्भधारणेनंतर लगेचच कधीही तुमची गर्भधारणा जास्त लोकांसोबत शेअर करू नयेत. ही आनंदाची बातमी असली तरीही ती सार्वजनिकरित्या सांगण्यासाठी किमान पाच महिने वाट पाहणे आवश्यक आहे. पण असं का याबाबत बोलताना तज्ज्ञांनी स्पष्टीकरण दिले आहे. 
राजस्थानमधील पाली येथील ओम हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. कीर्ती शर्मा यांनी अलीकडेच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की त्या त्यांच्या रुग्णांना गर्भधारणेच्या पाच महिन्यांपर्यंत सार्वजनिकरित्या गर्भधारणेची आनंदाची बातमी जाहीर करू नका असा सल्ला देतात.

Liver Cancer : क्रिकेटर रिंकू सिंहच्या वडिलांचे स्टेज-४ कॅन्सरने निधन; समजून घ्या लिव्हर कॅन्सरचा धोका आणि त्याचे टप्पे… 


‘या’ दोन चाचण्या आवश्यक

तज्ज्ञ गर्भधारणा जाहीर करण्यापूर्वी २ चाचण्या करण्याचा सल्ला देतात. त्यानंतर ही बातमी सार्वजनिक करण्याचा सल्ला देतात.  NT स्कॅन आणि अॅनोमली स्कॅन या दोन चाचण्या करण्याच्या शिफारस करतात. एक स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून, त्यांनी याची कारणं स्पष्ट केली आहेत. 

NT स्कॅन का आवश्यक आहे?

पहिल्या तीन महिन्यांत म्हणजे11 -12 आठवड्यात NT स्कॅन आवश्यक आहे. कारण या काळात बाळाच्या गुणसूत्रांची तपासणी करणे आवश्यक असते. ज्यामुळे डाउन सिंड्रोमचा धोका असल्याच तो निश्चित करण्यात मदत होऊ शकते.

अॅनोमली स्कॅन का आवश्यक आहे?

अॅनोमली स्कॅन हा 18 ते 22 आठवड्यांच्या दरम्यान केला जातो. यामध्ये बाळाच्या प्रत्येक अवयवाची तपशीलवार तपासणी केली जाते. यासाठी 20 मिनिटं ते 1 तास लागू शकतो. या स्कॅनमध्ये 90% स्ट्रक्चरल समस्या आढळतात. आकडेवारी दर्शवते की अंदाजे 2-3% गर्भधारणेमध्ये विसंगती आढळू शकतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही घाबरून जावे, तर तुम्ही विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक असते. 

5 महिन्यांनंतर गरोदरपणाची बातमी शेअर करण्याचे फायदे

अगदी पुर्वीपासून असं मानलं जायची की गरोदर असल्याची बातमी लगेच सार्वजनिक करु नयेत. अगदी घरातल्या वृद्ध महिलाही 3 महिने ही बातमी शेअर करू नकात असा सल्ला देत. कारण या काळात गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. माहितीच्या अभावामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते. पण भारतीय संस्कृतीत अशी परिस्थिती ही जादूटोणा आणि वाईट नजरेमुळे होते असे फार पूर्वीपासून मानले जात आहे. त्यामुळे असं मानण्यात येतं पण प्रत्यक्षात यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. सुरुवातीचे ३ महिने हे आईसाठी आणि पोटातील गर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात बाळाच्या आरोग्याशी आणि त्याच्या संबंधित विकासाशी गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाच असतं. अन्यथा गर्भपाताचेही धोके संभवतात. म्हणून, एकदा तुम्ही या दोन चाचण्या केल्या की, तुम्ही ही चांगली बातमी साजरी करण्यासाठी करु शकता. 

केस गळतीवर टोमॅटोचा रस रामबाण उपाय? टक्कल पडलेल्या ठिकाणीही येतील नवे केस; जाणून घ्या सत्य!

Web Title: Parenting why pregnancy news break after 5 months gynecologist reveals real reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • during pregnancy
  • pregnancy
  • pregnancy health
  • Pregnancy Test
  • Pregnant Issue
  • Pregnant woman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.