प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा असा हा टोमॅटो. पण तो जितका सहज उपलब्ध होतो. तितकासा सहज तो नाही आहे. त्याच्यामध्ये खूप सारखे शक्तीशाली घटक आहेत. लायकोपीनपासून व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. जे कोलेजन उत्पादन आणि टाळू निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. त्याचा फायदा केसांच्या मुळापासून वाढीला होतो. चला ते कसे लावायचे ते जाणून घेऊया.
टोमॅटो किती गुणकारक आहे हे आपण पाहिलं. पण याचा वापर कसा करायचा? तर टोमॅटोचा रस केसांना लावण्यासाठी, एक पिकलेला टोमॅटो घ्या. त्या टोमॅटोचा रस पूर्णपणे काढून घ्या. आता तुमच्या बोटांमध्ये रस घ्या आणि तुमच्या टाळूला हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यानंतर, रस कमीत कमी १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर तुमचे केस शॅम्पूने धुवा. अशा पद्धतीने टोमॅटोचा रस डोक्याला लावल्यानंतर केसांमध्ये नक्की फरक दिसून येतो.
टोमॅटोचा वापर जितका चांगला तितका बाईट ही ठरु शकतो. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा हा घरगुती उपाय करु शकता. लक्षात ठेवा की तो जास्त वेळा वापरल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जास्त वापर टाळा.






