'या' कारणामुळे वाढत्या वयात महिलांच्या त्वचेवर पिगमेंटेशन!
धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा महिला स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेत नाही. त्वचा, केस, शरीराकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. मात्र असे केल्यामुळे त्वचा अधिक वृद्ध आणि निस्तेज दिसू लागते. वाढत्या वयात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. हार्मोन्सचे होणारे असंतुलन, चेहऱ्यावर येणारे काळे डाग, वांग, पिंपल्स किंवा मासिक पाळीसंबंधित अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता योग्य सल्ला घेऊन उपचार करावे. वयाच्या ठराविक टप्पा ओलांडल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यात महिलांमध्ये दिसून येणारा बदल म्हणजे पिगमेंटेशन. पिगमेंटेशन वाढल्यानंतर त्वचा अतिशय निस्तेज आणि काळी दिसू लागते.(फोटो सौजन्य – iStock)
सिगारेट न पिता काळे झालेले ओठ सुधारण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा ट्राय, ओठ होतील गुलाबी
पिगमेंटेशन वाढल्यानंतर गाल, नाक आणि कपाळावर डाग मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. यामुळे त्वचा खराब होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणत्याही चुकीच्या क्रीम लावणे त्वचेसाठी घातक ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर पिगमेंटेशन का वाढते? पिगमेंटेशन वाढल्यानंतर कोणते उपाय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास तातडीने आराम मिळेल.
पिगमेंटेशन वाढण्यामागे अनेक कारण आहेत. जास्त उन्हात गेल्यामुळे चेहऱ्यावर पिगमेंटेशन वाढते, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण उन्हात बाहेर गेल्यानंतर सुद्धा पिगमेंटेशन वाढते आणि घरी बसल्यानंतर सुद्धा त्वचेवर पिगमेंटेशन वाढू लागते. उन्हात जास्त वेळ बाहेर गेल्यानंतर त्वचा सूर्याच्या थेट संपर्कात येते. सूर्याच्या युव्हीबी किरणांमुळे पिगमेंटेशन वाढण्याची जास्त शक्यता असते. तसेच घरात असल्यानंतर खिडकीतून, दरवाजातून सूर्यप्रकाश संपूर्ण घराच्या आतमध्ये येतो आणि लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईलच्या स्क्रीनमधून दिसणाऱ्या निळ्या प्रकाशामुळेसुद्धा त्वचेवर पिगमेंटेशन वाढण्याची शक्यता असते.
चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी कोणत्याही क्रीमचा वापर करून नये. यामुळे त्वचा आणखीनच खराब होऊ लागते. त्वचेची काळजी घेताना घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि छान होते. पिगमेंटेशन कमी करण्यासाठी उन्हळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये घरातून बाहेर जाताना सनस्क्रीन नियमित लावावे. यामुळे त्वचेचे हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होईल. सर्वच ऋतूंमध्ये सनस्क्रीनचा वापर करावा.
पिगमेंटेशन घालवण्यासाठी वाटीमध्ये भाजलेली हळद घेऊन त्यात मध घालून पेस्ट तयार करा. तयार केलेला लेप संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या किंवा पिगमेंटेशन आलेल्या ठिकाणी लावले तरी चालेल. त्यानंतर १५ मिनिटं हळदीचा लेप त्वचेवर लावून ठेवा. १५ मिनिटं झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास पिगमेंटेशन कमी होईल.