तेलकट झालेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉश किंवा साबणाचा वापर न करता तुरटीचा करा वापर
त्वचा स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. कधी फेशवॉश लावले जाते तर कधी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळे साबण त्वचेवर लावले जातात. मात्र तरीसुद्धा त्वचेमध्ये कोणताच बदल दिसून येत नाही. चेहऱ्यावर केमिकलयुक्त साबण लावल्यामुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. त्वचेवर स्किन काळवंडल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर किंवा वेगवेगळ्या क्रीमचा वापर करतात. पण हे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी तुरटीचा वापर करावा. बऱ्याचदा पुरुष दाढी केल्यानंतर तुरटीचा वापर करतात. दाढी केल्यानंतर चेहऱ्यावरून तुरटी फिरवी जाते. त्वचेसाठी तुरटी अतिशय प्रभावी आहे. त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यानंतर तुरटीचा वापर करावा. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात आणि त्वचा स्वच्छ होते.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हामुळे तेलकट किंवा चिकट झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर न करता तुरटीचा वापर करावा. तुरटीच्या वापरामुळे त्वचा आतून स्वच्छ होते. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी तुरटीचा वापर करावा. यामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. तुरटी चेहऱ्यावर लावल्यामुळे कोणतेही गंभीर परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुरटीचा वापर कसा करावा? तुरटी वापरल्यामुळे त्वचेला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामध्ये असलेले नॅचरल अॅंटी-सेप्टिक गुणधर्म त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळवून देतात.
तुरटीमध्ये असलेले गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यामुळे तुमचा चेहरा अतिशय क्लीन आणि स्वच्छ दिसेल. पिंपल्स, फोड, स्किन इन्फेक्शन किंवा त्वचेच्या अनेक समस्यांपासून कायमचा आराम मिळवून देण्यासाठी तुरटी मदत करेल. त्वचेवर वाढलेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी तुरटीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. त्वचेच्या ओपन पोर्समध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करावा.
तुरटीचा फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावला जातो. तसेच तुरटीचा वापर करून तुम्ही चेहरा स्वच्छ धुवू शकता. रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर तुरटी चेहऱ्यावर फिरवल्यास त्वचा अधिक स्वच्छ होईल. तुरटी फिरवल्यानंतर त्वचेवर कोणताही साबण किंवा फेशवॉश लावू नये. तुरटी फिरवून त्वचा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने त्वचा पुसून घ्या.
खरंच Sunscreen लावल्याने शरीरातील Vitamin D कमी होते? ‘हे’ आहे सत्य
चेहरा स्वच्छ धुवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. तुरटीचा वापर करून चेहरा तुम्ही एकदा किंवा दोनदाच धुवू शकता. जास्त वेळ तुरटी चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेक पडू शकते. दोन वेळेपेक्षा जास्त वेळ तुरटी त्वचेवर लावू नये. यामुळे चेहऱ्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. तुरटी लावल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी.