पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
Pitru Paksh 2026: २६ सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये पितरांचे श्रद्ध केले जाते आणि नैवेद्यासाठी घरात वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात.श्राद्धाच्या दिवशी घरात वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यातील आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर. तांदळाची खीर सणावाराच्या दिवसांमध्ये बनवली जाते. पण बऱ्याचदा खीर बनवताना ती खूप जास्त पातळ होऊन जाते. त्यामुळे या पारंपरिक पद्धतीमध्ये खीर बनवल्यास चवीला अतिशय सुंदर लागेल. बासमती किंवा गावठी तांदूळ, वेलची पावडर आणि दुधाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यात विविध पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया पारंपरिक पद्धतीमध्ये तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






