Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींना आवडतात गुजरातमधील हे दोन खास पदार्थ; Taste Atlas शेअर केली वर्ल्ड लीडर्सच्या फेव्हरेट पदार्थांची यादी

टेस्ट अ‍ॅटलास या प्रसिद्ध फूड गाईडने अलीकडेच जगभरातील नेत्यांना आपल्या आहारात कोणते पदार्थ खायला आवडतात याची रंजक यादी शेअर केली आहे. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 27, 2025 | 08:15 PM
पंतप्रधान मोदींना आवडतात गुजरातमधील हे दोन खास पदार्थ; Taste Atlas शेअर केली वर्ल्ड लीडर्सच्या फेव्हरेट पदार्थांची यादी

पंतप्रधान मोदींना आवडतात गुजरातमधील हे दोन खास पदार्थ; Taste Atlas शेअर केली वर्ल्ड लीडर्सच्या फेव्हरेट पदार्थांची यादी

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक देशाचा कारभार चालवण्याही त्या त्या देशात देशाचा पंतप्रधान नेमला जातो. सलग तीन वेळा जनतेचे बहुमत मिळवत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनले आहेत. प्रत्येकाच्या आवडीचं कम्फर्ट फूड काही वेगळं असत, अशात जगभरातील लीडर्सना त्यांच्या ताटात कोणता पदार्थ खायला सर्वात जास्त आवडत असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अलीकडेच प्रसिद्ध फूड गाईड टेस्ट अ‍ॅटलासने एक अतिशय मनोरंजक यादी शेअर केली आहे, ज्यामध्ये जगभरातील टॉप लॉडर्सना आपल्या थाळीत कोणता पदार्थ अधिक आवडतो ते शेअर करण्यात आले आहे. या यादीत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवडते गुजराती पदार्थ देखील आहेत जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चला या पक्वान्नाची माहिती जाणून घेऊया.

‘ससुराल गेंदा फूल’, सासू-सून, सासू-नणंदेच्या भांडणात कसे ठेवाल स्वतःला आनंदी, नव्या नवरीसाठी सोप्या टिप्स

ढोकळा

या लिस्टनुसार, पंतप्रधान मोदींना आपल्या आहारात ढोकळा खायला फार आवडतो. हा गुजरातमधील एक फेमस नाश्त्याचा प्रकार आहे. हा शाकाहारी पदार्थ देशभरात आवडीने खाल्ला जातो. सकाळच्या नाश्त्याला हलका फुलका पदार्थ शोधत असाल तर हा पदार्थ तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. हा वाफवून बनवलेला असल्याने तो आरोग्यासाठी चांगला मानला जातो. ढोकळा बनवण्यासाठी तांदूळ, डाळ, दही, सोडा आणि मसाले वापरले जातात. ढोकळाला खमण ढोकळा (Khaman Dhokla) असेही म्हणतात.

साहित्य

  • तांदूळ
  • डाळ
  • बेसन
  • दही
  • सोडा
  • हळद
  • मीठ
  • साखर
  • मोहरी
  • जिरे
  • हिरवी मिरची
  • कढीपत्ता
  • तेल

बनवण्याची पद्धत

  • यासाठी प्रथम तांदूळ आणि डाळ भिजवून वाटून घ्या
  • त्यात दही, सोडा, मसाले आणि पाणी मिक्स करा
  • हे मिश्रण वाफवण्यासाठी ठेवा
  • वाफवून झाल्यावर, फोडणी तयार करा
  • यासाठी एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता टाका आणि ही तयार फोडणी ढोकळ्यावर ओता
  • ढोकळा चिंच-गुळाची चटणी आणि पुदिच्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह केला जातो

खांडवी

खांडवी (khandvi) हा देखील एक गुजराती नाश्त्याचा प्रकार आहे जो बेसन आणि दह्यापासून बनवला जातो. हे गुंडाळलेल्या आणि वाफवलेल्या चौरसांच्या रूपात असते आणि ते चवदार, पौष्टिक आणि आहारात चांगले मानले जाते. याला खांडवी, पाटुली, दहिवडी, सुरळीची वाडी अशा नावानेही ओळखले जाते. महाराष्ट्रातही हा पदार्थ फार फेमस आहे.

साहित्य

  • बेसन: 1 कप
  • दही: 1 कप (गरम किंवा थंड)
  • पाणी: 1/2 कप (आवश्यकतेनुसार)
  • तेल: 2 चमचे (फोडणीसाठी)
  • मीठ: चवीनुसार
  • हळद: 1/2 चमचा
  • तेल: 1 चमचा
  • मोहरी: 1/2 चमचा
  • कढीपत्ता: 1-2 पाने
  • हिरवी मिरची: 1-2 (ठेचलेली)
  • हिंग: चिमुटभर
  • पांढरे तीळ: 1 चमचा (पर्यायी)
  • किसलेला नारळ
  • कोथिंबीर

बनवण्याची पद्धत

  • एका मोठ्या भांड्यात बेसन, दही, पाणी, मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर (जर वापरत असाल) एकत्र करा. चांगले मिक्स करा. मिश्रण जाडसर आणि चिकट असावे
  • एक कढई गरम करा. त्यात मिश्रण ओता आणि सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा
  • शिजलेल्या मिश्रणाला एका सपाट प्लेटवर किंवा प्लास्टिकच्या शीटवर पातळसर पसरवा
  • हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या
  • थंड झाल्यावर, खांडवीला 2-3 सेमी (1 इंच) तुकड्यात गुंडाळा
  • एका छोट्या कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हिंग घाला. फोडणी तयार झाल्यावर त्यात पांढरे तीळ घाला
  • तयार खांडवीवर फोडणी, किसलेला नारळ आणि कोथिंबीर टाका आणि खाण्यासाठी सर्व्ह करा

जिभेच्या रंगांवरून ओळखा भयंकर आजाराची लक्षणे! ‘या’ रंगाची जीभ दिसताच डॉक्टरांचा घ्या योग्य सल्ला

खिचडी

या लिस्टमध्ये तिसरा आणि शेवटचा पदार्थ आहे खिचडीला लिस्ट करण्यात आले आहे. खिचडी ही एक साधी, सोपी आणि पौष्टिक भारतीय डिश आहे. फार जुन्या काळापासून भारतात हा पदार्थ खाल्ला जात आहे. हा पदार्थ तांदूळ आणि डाळ (विशेषतः मूग डाळ) वापरून बनवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी बनवता येतात, जसे की साधी खिचडी, मसाला खिचडी, आणि डाळ खिचडी.

साहित्य

  • तांदूळ (1 कप)
  • कांदा
  • मूग डाळ (1/2 कप)
  • पाणी (3.5 ते 4 कप)
  • तेल (1 चमचा)
  • टोमॅटो
  • जिरे (1 चमचा)
  • हिंग (1/2 चमचा)
  • हळद (1/2 चमचा)
  • मीठ (चवीनुसार)
  • कोथिंबीर

बनवण्याची पद्धत

  • यासाठी सर्वप्रथम तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुऊन घ्या
  • एका भांड्यात तेल गरम करा आणि त्यात जिरे आणि हिंग टाका
  • यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून छान शिजवून घ्या
  • मग त्यात हळद आणि मीठ घालून परतून घ्या
  • आता यात डाळ, तांदूळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून सर्व साहित्य मिक्स करा
  • कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या घ्या किंवा कमी गॅसवर 20-25 मिनिटे शिजू द्या
  • गरम गरम खिचडी पापड किंवा लोणच्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Pm modi loves to eat these gujarati dishes taste atlas shares list of favorite dishes of world leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • marathi recipe
  • narendra modi
  • PM Narendra Modi
  • tasty food

संबंधित बातम्या

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
1

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?
2

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?
3

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: 10 हजार रुपयांच्या योजनेमुळे बदलले बिहारचे राजकीय गणित? नितीश कुमारांची गेम-चेंजर योजना!
4

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: 10 हजार रुपयांच्या योजनेमुळे बदलले बिहारचे राजकीय गणित? नितीश कुमारांची गेम-चेंजर योजना!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.