Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Post Meal Acidity: जेवल्यानंतर छातीत जळजळ होते? मग ‘हे’ घरगुती उपाय त्वरित मिळवून देतील आराम, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका

Post Meal Acidity: जेवल्यानंतर लगेच घशाजवळ पित्त किंवा आंबट ढेकर येत असतील तर झोपेच्या आणि जेवणाच्या वेळेत बदल करणे फार आवश्यक आहे. अन्यथा वारंवार पित्ताचा त्रास वाढू शकतो. वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2026 | 05:30 AM
जेवल्यानंतर छातीत जळजळ होते? मग 'हे' घरगुती उपाय त्वरित मिळवून देतील आराम, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका

जेवल्यानंतर छातीत जळजळ होते? मग 'हे' घरगुती उपाय त्वरित मिळवून देतील आराम, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका

Follow Us
Follow Us:

Post Meal Acidity: जीवनशैलीत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, जेवणाच्या चुकीच्या वेळा, जंक फूडचे अतिसेवन, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम थेट शरीरावर दिसून येतो. बऱ्याचदा जेवल्यानंतर आंबट ढेकर येणे, छातीत तीव्र जळजळ होणे, खाल्लेले अन्नपदार्थ अचानक घशाजवळ येणे, तोंडात पिवळसर, आंबट किंवा कडू चव पसरणे इत्यादी वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. आहारात होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे ही लक्षणे एकदा तरी दिसून येतात. घशात जमा होणाऱ्या पित्तामुळे तोंडाची संपूर्ण चव खराब होऊन जाते. त्यामुळे वारंवार जेवणानंतर घशाजवळ आंबट पित्त जमा होत असेल तर हे घरगुती उपाय नक्कीच करून पहा. यामुळे पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळेल आणि तोंडाची चव खराब होणार नाही.(फोटो सौजन्य – istock)

Weight Loss: पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी! भूक लागल्यानंतर ‘या’ पदार्थांचे आवर्जून करा सेवन, राहाल कायमच फीट

पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

जेवणानंतर लगेच घशात पित्त जमा होत असेल तर जेवण आणि झोपेत ३ तासांचे अंतर असणे फार आवश्यक आहे. याशिवाय त्रास सुरु झाल्यानंतर अजिबात झोपू नये. सरळ बसून राहिल्यामुळे किंवा उभे राहिल्यामुळे पोटातील अन्न आणि ॲसिड पुन्हा एकदा खाली जाण्यास मदत होते. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे घशात पित्त जमा होण्याची शक्यता असते.

जास्त तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, चॉकलेट, कॉफी व कॅफिनयुक्त पेये, मद्यपान, पुदिना, संत्री/लिंबू यांसारख्या आंबट पदार्थांचे सेवन उपाशी पोटी केल्यास ॲसिडिटीचा त्रास वाढतो. त्यामुळे उपाशी पोटी सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. रात्रीच्या वेळी सतत घशात आंबट पाणी येत असेल तर झोपताना डोक्याकडील आणि छातीकडील भाग थोडा उंचावून झोपावे. जेणेकरून पित्ताचा त्रास वाढणार नाही.

घशात किंवा अन्ननलिकेत अडकल्याची भावना निर्माण होणे ही केवळ अन्न अडकल्याची स्थिती नसून शरीरसंबंधित गंभीर आजाराची लक्षणे आहेत. अन्न गिळताना त्रास होणे, वारंवार उलट्या, शौचातून किंवा उलटीतून रक्त पडणे इत्यादी लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. अन्ननलिकेची सूज, अडथळा किंवा इतर गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर ही लक्षणे दिसून येतात.

Gut Health: पचनक्रियेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत त्रिफळा चूर्णा खाल्याने शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत

गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज झाल्यानंतर तात्पुरता उपचार करणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. प्रोटॉन पंप इनहिबिटर्स सारखी ॲसिड कमी करणारी औषधे ॲसिडिटीवर अत्यंत प्रभावी ठरतात. पण या औषधांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे. वारंवार घशात आंबट पाणी किंवा पित्ताचा त्रास होत असेल तर मेडिकलमधील कोणत्याही गोळ्यांचे सेवन करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जेवल्यानंतर लगेच झोपल्याने अॅसिडिटी वाढते का?

    Ans: होय, काही व्यक्तींमध्ये जेवल्यानंतर लगेच आडवे पडल्याने पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जेवल्यानंतर किमान २–३ तास आडवे पडणे टाळावे.

  • Que: अॅसिडिटीचा त्रास वारंवार होत असल्यास काय करावे?

    Ans: आठवड्यातून वारंवार छातीत जळजळ होत असल्यास, रात्री झोपेत त्रास होत असल्यास किंवा घरगुती उपायांनी आराम मिळत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वारंवार होणारा अॅसिड रिफ्लक्स योग्य उपचारांची गरज दर्शवू शकतो.

  • Que: ध प्यायल्याने छातीत जळजळ कमी होते का?

    Ans: दूध प्यायल्याने काही काळ आराम मिळू शकतो; मात्र पूर्ण फॅट असलेले दूध काही व्यक्तींमध्ये जळजळ वाढवू शकते. त्यामुळे दूध हा अॅसिडिटीवरील खात्रीशीर उपाय नाही.

Web Title: Post meal acidity do you experience heartburn after eating these home remedies will provide instant relief and help you get rid of acidity issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • acidity
  • Digestion Problem
  • gut health

संबंधित बातम्या

Gut Health: पचनक्रियेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत त्रिफळा चूर्णा खाल्याने शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत
1

Gut Health: पचनक्रियेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत त्रिफळा चूर्णा खाल्याने शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
2

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.