Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Grey Hair: तरुण वयात केस पांढरे होत आहेत? ‘या’ सवयी बदला, नाहीतर वाढू शकते समस्या

Tips To Prevent Premature Grey Hair: कमी वयातच केस पांढरे होण्यामागे कारणे कोणती तसेच यासाठी कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 08, 2026 | 08:22 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • तरुण वयात केस पांढरे होत आहेत?
  • ‘या’ सवयी बदला
  • नाहीतर वाढू शकते समस्या
आजकाल कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. पूर्वी वाढत्या वयाचे लक्षण मानले जाणारे पांढरे केस आता तरुणांमध्ये आणि अगदी टिनेजर मुलांमध्येही दिसू लागले आहेत. बदलती जीवनशैली, तणाव, चुकीचा आहार आणि केसांची योग्य काळजी न घेणे ही यामागची प्रमुख कारणे मानली जातात. त्यामुळे अनेक तरुणांमध्ये आत्मविश्वास कमी होतो. मात्र आरोग्याची योग्य काळजी घेतल्याने आणि काही चांगल्या सवयी अंगीकारल्याने केस पांढरे होण्याची समस्या नियंत्रणात आणली जाऊ शकते.

Glowing Skin Tips: पार्लरचा खर्च वाचणार! रोज प्या ‘हे’ १ सुपरहेल्दी ड्रिंक; चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो

केस पांढरे होण्यामागची कारणे

तज्ज्ञांच्या मते शरीरात मेलानिन नावाचे पिगमेंट कमी होऊ लागल्यास केसांचा नैसर्गिक काळा रंग कमी होतो. यामागे पोषणाची कमतरता, धूम्रपान, जास्त तणाव, प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनांचा अति वापर कारणीभूत ठरू शकतो. परंतु, अनेकदा ही समस्या आनुवंशिक कारणांमुळेही उद्भवू शकते.

आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा

हिरव्या भाज्या, अंडी, ड्राय फ्रुट्स, दूध, दही आणि प्रोटीनयुक्त पदार्थ केसांसाठी फायदेशीर मानले जातात. शरीरात व्हिटॅमिन B12, आयरन आणि झिंकची कमतरता असल्यास केस लवकर पांढरे होऊ शकतात. त्यामुळे दररोजच्या जीवनात संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे.

तणाव कमी ठेवणे आवश्यक

अत्याधिक तणावाचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. योग, मेडिटेशन आणि नियमित व्यायामामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते तणाव नियंत्रित ठेवल्यास केस अकाली पांढरे होण्याचा वेग कमी होऊ शकतो.

केसांना तेल मालिश करा

नियमित तेल मालिश आणि स्कॅल्प मसाज केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते. नारळ तेल, बदाम तेल किंवा आवळा तेल वापरल्यास केस मजबूत राहण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हलक्या हाताने मसाज करणे फायदेशीर ठरू शकते.

केमिकलयुक्त उत्पादनांपासून सावध रहा

जास्त प्रमाणात हेअर कलर, स्ट्रेटनिंग किंवा केमिकलयुक्त शॅम्पू वापरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक आणि हर्बल उत्पादनांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

निरोगी जीवनशैलीच ठरू शकते उपाय

पुरेशी झोप, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि कमी ताण तणाव असलेली जीवनशैलीमुळे केसांचे आरोग्य सुधारू शकते. वेळेवर काळजी घेतल्यास अकाली पांढऱ्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवता येऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: हिमोग्लोबिन कमी आहे? रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल रक्ताची कमतरता

Web Title: Premature grey hair causes and tips to prevent white hair naturally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • hair care tips
  • hair care tips in marathi
  • hair news

संबंधित बातम्या

Hair Botox:  हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
1

Hair Botox: हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Hair Beauty: केसांची वाढ खुंटली आहे? मग चमचाभर मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ
2

Hair Beauty: केसांची वाढ खुंटली आहे? मग चमचाभर मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.