Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

30 वयाच्या आतच महिलांमध्ये आढळतेय ‘Premature Ovarian Failure’ ची समस्या, प्रजनन आरोग्याकडे लक्ष गरजेचे

तरुणींनीही प्रजनन आरोग्याकडे विशेष लक्ष देण गरजेचे असून वंधत्व निवारण व्हायला हवे असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. वयाच्या ३० व्या वर्षीच या समस्या उद्भवू लागल्या आहेत. नक्की काय आहे कारणं?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 24, 2026 | 10:26 AM
प्रिमॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअरची वाढती समस्या (फोटो सौजन्य - iStock)

प्रिमॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअरची वाढती समस्या (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • प्रिमॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअर म्हणजे काय 
  • वयाच्या तिशीतच महिलांना उद्भवतेय समस्या 
  • तज्ज्ञांनी काय दिलाय सल्ला जाणून घ्या 
महिलांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक बाब समोर येत आहे. २५ ते २६ वयोगटातील महिलांमध्ये प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (POF) सारखी समस्या आढळून येते. प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणजे स्त्रियांच्या शरीरात विशिष्ट प्रमाणात स्त्री बीज असतात. प्रत्येक मासिक पाळी वेळी एक स्त्री बीज तयार होते अणि गर्भधारणा नाही झाल्यास ते मासिक पाळीच्या माध्यमातून शरीराबाहेर जाते. मात्र जेव्हा मासिक पाळी जाते तेव्हा सर्व स्त्री बीज संपते. कमी वयात असे झाल्यास त्याला प्री मॅच्युअर ओव्हरीयन फेल्युलर म्हणतात. अशा समस्येने त्रस्त दर महिन्याला सुमारे ३–४ नव्या रुग्णांची नोंद होत असून, वेळीच जागरूकता आणि उपचाराची गरज तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे.

सामान्यतः हा वयोगट उत्तम प्रजननक्षमत असलेला वयोगट म्हणून ओळखला जातो. मात्र बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि काही अंतर्गत वैद्यकीय कारणांमुळे अंडाशयांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (POF), ज्याला अर्ली ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असेही म्हटले जाते, ही अशी स्थिती आहे ज्यात ४० वर्षांपूर्वीच अंडाशयाचे कार्य कमी होते किंवा थांबते. यामुळे अंड्यांची निर्मिती कमी होते किंवा थांबते आणि इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी घटते. याचा परिणाम प्रजननक्षमतेवर तसेच संपूर्ण हार्मोनल संतुलनावर होतो. नैसर्गिक मेनोपॉजपेक्षा ही स्थिती वेगळी असली तरी गर्भधारणेवर याचा मोठा परिणाम होतो.

काय आहेत कारणं 

या आजारामागील कारणांमध्ये आनुवंशिकता किंवा कौटुंबिक इतिहास, ऑटोइम्यून विकार (ज्यात शरीर स्वतःच्या अंडाशयांवर हल्ला करते), आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, वाढलेला ताणतणाव, अनियमित झोप, पर्यावरणीय घटक, विषारी पदार्थांचा संपर्क तसेच केमोथेरपी किंवा रेडिएशनसारखे उपचार यांचा समावेश होतो.प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (POF) आजाराच्या लक्षणांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे किंवा बंद होणे, गर्भधारणेत अडचणी येणे, हॉट फ्लॅशेस व रात्री घाम येणे, मूड स्विंग्ज व चिडचिड, योनी  मार्गाचा कोरडेपणा आणि लैंगिक इच्छेत घट.

बाळाला जन्म देण्यासाठी पुरुषांचा Sperm Count किती पाहिजे, कशी करावी तपासणी

काय सांगतात तज्ज्ञ

गेल्या काही महिन्यांत आम्ही विशेषतः २५ ते २६ वयोगटातील ३ ते ४ तरुण महिलांमध्ये प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअरच्या लक्षणांचे निदान करत आहोत. पूर्वी या वयोगटात अशी प्रकरणं अपेक्षित नव्हती असे मत वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. रश्मी निफाडकर, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, बाणेर, पुणे यांनी व्यक्त केले.

त्या पुढे म्हणाल्या, हा आजार मानसिकदृष्ट्याही तणावास कारणीभूत ठरतो, विशेषतः ज्या महिलांना कुटुंब नियोजन करायचे आहे त्यांना यामुळे तणावाचा सामना करावा लागतो. वेळीच निदान करणे अत्यंत गरजेचे असून  हार्मोन तपासण्या, विशेषतः एएमएच टेस्ट, तसेच सोनोग्राफीद्वारे अंडाशयांची क्षमता तपासता येते. बऱ्याचदा नैसर्गिक गर्भधारणा अवघड असू शकते, मात्र वेळीच निदान झाल्यास एग फ्रीझिंग, डोनर एगसह आयव्हीएफ आणि हार्मोन थेरपी यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. मासिक पाळीत अनियमितता किंवा इतर लक्षणे दिसल्यास उपचारास विलंब करू नये.

पुरुषांनो! आयुर्वेदिक विधीने वाढू शकते लैंगिक क्षमता आणि Fertility, तज्ज्ञांनी दिला योग्य सल्ला

प्रिमॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअर म्हणजे नेमके काय?

प्रिमॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअर (POF) हा केवळ प्रजननक्षमतेपुरता मर्यादित नसून तो हार्मोनल आरोग्यावर परिणाम करतो. इस्ट्रोजेनची कमी पातळी हाडे, हृदय आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकते. अनेक तरुण महिला अनियमित मासिक पाळीकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याला फक्त ताणतणावाचे कारण मानतात. 

मात्र सतत अशी लक्षणे दिसत असल्यास त्याकडे  गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आम्हाला दर महिन्याला १ ते २ प्रकरणं आढळतात आणि आम्ही योग्य हार्मोनल सपोर्ट, ताणतणाव नियंत्रण, संतुलित आहार, व्यायाम आणि नियमित तपासणीचा सल्ला देतो. प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (POF) असतानाही महिला निरोगी आणि समाधानी जीवन जगू शकतात, असे मत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुजाता उदय राजपूत, मदरहुड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी व्यक्त केले.

तज्ज्ञांच्या मते, तरुण महिलांमध्ये वाढणारी ही समस्या एक धोक्याची घंटा असून विशीतील तरुणींनीही प्रजनन आरोग्याकडे विशेष लक्ष देण गरजेचे आहे . याबाबत पुरेशी जागरूकता, वेळीच निदान आणि उपचारांच्या मदतीने या स्थितीवर नियंत्रण ठेवता येते आणि तुमचे आरोग्य जपण्यासाठी मदत होते.

Web Title: Premature ovarian failure is being observed in women under the age of 30 attention to reproductive health is essential

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news in marathi
  • women health

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात नाजूक अवयवांमध्ये इन्फेक्शन वाढले आहे? व्हजायनल दुर्गंधी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
1

उन्हाळ्यात नाजूक अवयवांमध्ये इन्फेक्शन वाढले आहे? व्हजायनल दुर्गंधी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Brain Tumor: मेंदूचे आरोग्य आणि जीवनशैलीचा काय संबंध? काय आहे जोखीम
2

Brain Tumor: मेंदूचे आरोग्य आणि जीवनशैलीचा काय संबंध? काय आहे जोखीम

पनीर की अंडा भुर्जी? दोघांमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? फरक जाणून घ्या
3

पनीर की अंडा भुर्जी? दोघांमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? फरक जाणून घ्या

Healthy Drink: फॅटी लिव्हरपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ ड्रिंक्स ठरतील वरदान; वाचा आरोग्यदायी फायदे
4

Healthy Drink: फॅटी लिव्हरपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ ड्रिंक्स ठरतील वरदान; वाचा आरोग्यदायी फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.