Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळमधील राहुल गांधींचा ‘वायनाड’ मतदारसंघ पर्यटकांसाठी स्वर्गाहून कमी नाही, फिरण्यासाठीचा उत्तम वेळ जाणून घ्या

Travel Tips : केरळमधील वायनाड हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखे ठिकाण आहे. हिरव्यागार डोंगर, धबधबे आणि शांत वातावरणामुळे येथे काही दिवस घालवणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 06, 2026 | 09:32 AM
केरळमधील राहुल गांधींचे मूळ गाव 'वायनाड' हे पर्यटकांसाठी स्वर्गाहून कमी नाही, फिरण्यासाठीचा उत्तम वेळ जाणून घ्या

केरळमधील राहुल गांधींचे मूळ गाव 'वायनाड' हे पर्यटकांसाठी स्वर्गाहून कमी नाही, फिरण्यासाठीचा उत्तम वेळ जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • वायनाडमध्ये डोंगर, जंगल, धबधबे आणि तलाव यांचा सुंदर संगम अनुभवता येतो.
  • इथे अनेक आकर्षक पर्यटनस्थळे येथे आहेत.
  • मुंबईहून अनेक मार्गांनी वायनाडला भेट देता येतो.
केरळला “देवाचे स्वतःचे घर” असे म्हटले जाते, आणि ते अगदी योग्यही आहे. हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याने वेढलेले घाट, शांत तलाव आणि दाट जंगल यामुळे येथे निसर्गाचा स्वर्गीय अनुभव मिळतो. अशाच या सुंदर राज्यातील वायनाड हा जिल्हा आपल्या अप्रतिम सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. राजकारणातही वायनाडचे महत्त्व आहे, कारण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी  येथून निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. वायनाड हा निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे डोंगर, धबधबे, गुहा, जंगल आणि शांत वातावरण यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. वेलची, मिरी आणि कॉफीच्या शेतीमुळे हा परिसर आणखी सुगंधित आणि आकर्षक वाटतो. जर तुम्हाला शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन काही दिवस शांततेत घालवायचे असतील, तर वायनाड हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

एडक्कल लेणी

एडक्कल लेणी ही वायनाडमधील एक ऐतिहासिक आणि रहस्यमय जागा आहे. येथे प्राचीन काळातील शिलालेख आणि कोरीव काम पाहायला मिळते. लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडे पायी चालावे लागते, पण वरून दिसणारा नजारा अत्यंत मनमोहक असतो.

पूकोट तलाव

पूकोट तलाव हा शांत आणि निसर्गरम्य तलाव हिरव्या टेकड्यांनी वेढलेला आहे. येथे होडीविहाराचा आनंद घेता येतो. कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण खास आहे.

मीनमुट्टी धबधबा

मीनमुट्टी धबधबा हा वायनाडमधील सर्वात भव्य धबधब्यांपैकी एक आहे. तीन टप्प्यांत कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी जंगलातून पायी जावे लागते. साहसी प्रवाशांसाठी हा अनुभव खास ठरतो.

बाणासुरा सागर धरण

बाणासुरा सागर धरण हे भारतातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक आहे. धरणाच्या मध्यभागी असलेली छोटी बेटे आणि सभोवतालचे दृश्य मनाला भुरळ घालते. येथे जलक्रीडांचा आनंदही घेता येतो.

मुथंगा वन्यजीव अभयारण्य

मुथंगा वन्यजीव अभयारण्य हे वन्यजीवप्रेमींसाठी आदर्श ठिकाण आहे. येथे जंगलभ्रमंतीदरम्यान हत्ती, हरीण, गवा आणि कधीमधी वाघही पाहायला मिळू शकतात.

भारतातील सर्वात Haunted Beach, इथे आहे भयानक आत्मांचे वास्तव… चुकूनही जाण्याची हिंमत करू नका

मुंबईहून वायनाडला कसे जायचे?

रेल्वेने
मुंबईहून वायनाडला जाण्यासाठी थेट रेल्वे नाही. जवळचे स्थानक Kozhikode Railway Station आहे. मुंबई ते कोझिकोड हा प्रवास सुमारे २४ तासांचा असतो. त्यानंतर बस किंवा भाड्याने वाहन घेऊन २-३ तासांत वायनाडला पोहोचता येते.

विमानाने
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport येथून Calicut International Airport पर्यंत थेट विमानसेवा उपलब्ध आहे. हा प्रवास साधारण २ तासांचा असतो. त्यानंतर भाड्याने वाहन किंवा बसने ३-४ तासांत वायनाडला पोहोचता येते.

 

Web Title: Rahul gandhis constituency in kerala wayanad is best place for tourists to visit travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Kerala
  • Rahul Gandhi
  • tourism

संबंधित बातम्या

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Mallikarjun Kharge News: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेच्या ‘शुद्धीकरण’; भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा; बंगळूरमध्ये Zero FIR!
2

Mallikarjun Kharge News: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेच्या ‘शुद्धीकरण’; भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा; बंगळूरमध्ये Zero FIR!

Travel News : भारतातील  3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या
3

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे
4

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.