ही ट्रिक फॉलो करून राज कपूरने केले 55 किलो वजन कमी ; ना डाएट, ना जिम फक्त 'या' गोष्टी फॉलो करा
आजकालच्या जगात लठ्ठपणा एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे आपण बाहेरच खराब दिसत नाही तर आपले आंतरिक आरोग्यही खराब होत असते. लठ्ठपणामुळे आरोग्याच्या अनेक आजरांना खुले आमंत्रण मिळते अशात आपले वजन नियंत्रणात ठेवणे फार गरजेचे आहे. लहान असो, तरुण असो वा वृद्ध प्रत्येक वयोगटासाठी ही एक मोठी समस्या आहे. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन झपाट्याने वाढत असते अशात आपल्या जीवनशैलीत काही महत्तवपूर्ण बदल करणे फार गरजेचे आहे.
अभिनेता राज कपूरने वयाच्या पन्नाशी पार केल्यांनतरही आपल्या शरीरावरची अतिरिक्त चरबी जळत आपले तब्बल ५५ किलो वजन कमी केले. त्यांच्या या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे आणि यातही आश्चर्याची गोष्ट ही आहे की, हे वजन कमी करण्यासाठी त्याने कोणत्याही डाएटची किंवा जिमची मदत घेतली नाही तर फक्त आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करून त्यांना नियमानुसार फॉलो केले आणि रिजल्ट सर्वांच्या समोर आहे… आपल्या ट्रान्सफॉर्मेशनची जर्नी शेअर करताना त्याने म्हटले की, “मी हे सगळं जुन्या पद्धतीने केलं – नॉर्मल विचार, शिस्त आणि गरज पडली तिथे डॉक्टरांचा सल्ला.” चला त्याने कोणकोणत्या गोष्टी फॉलो करून आपले वजन कमी केले ते जाणून घेऊया.
जेवणाच्या दोन वेळा
वृत्तानुसार, आपल्या वजन कमी करण्याच्या जर्नीत राम कपूर फक्त दोन वेळा जेवत असे, एकदा सकाळी १०:३० ला आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ६:३० वाजता. याला इंटरमिटेंट फास्टिंग असे म्हटले जाते. यात जेवणाच्या दोन वेळांमध्ये १६-१७ तासांचा फास्टिंग पिरियड ठेवला जातो. याचा फायदा असा होतो की याच्या मदतीने आपल्या शरीरात जमा झालेली सर्व अतिरिक्त चरबी वितळून जाते आणि याचे रूपांतर उर्जेमध्ये होऊ लागते. यामुळे नैसर्गिकपणे झपाट्याने आपले वजन कमी होऊ लागते. याशिवाय त्याने आपल्या जेवणात किती अन्नाचा समावेश करावा यावरही लक्ष ठेवले.
स्नॅक्स खायचं नाही
आपल्याला अधनंमधनं लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राम कपूरने कठोर नियम बनवला. दिवसभरात जेवण सोडलं तर काहीच खायचं नाही. म्हणजेच मध्ये ना तुम्ही ना बिस्कीट खाऊ शकता ना चिप्स आणि फ्रुट्सही नाही! यामुळे सतत खाण्याच्या सवयीपासून मुक्ती मिळण्यास मदत होते आणि क्रेविंग्सवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. ही सवय वजन कमी करण्याच्या तुमच्या जर्नीत तुम्हाला फार मदत करू शकते.
संध्याकाळी ६:३० नंतर काहीही खायचं नाही
राम कपूर संध्याकाळी ६:३० नंतर काहीही खात नसत. त्यांनी सांगितले की, ते कोणत्या बर्थडे पार्टीसाठी किंवा मुलांबरोबर आऊटिंगवर जरी गेले तरी तिथे ते फक्त पाणी पित होते. याला Early Time-Restricted Feeding असे म्हटले जाते. यामुळे पचनाच्या समस्यांपासून सुटका होते आणि पचनात कोणताही अडथळा येत नाही. यामुळे मेटॅबॉलिज्म मजबूत होण्यासही मदत होते.
वजन कमी करायचं असेल तर बाहेरून उपाय नको
राम कपूरने सांगितले की, त्याने कोणतीही सर्जरी केली नाही ना वजन कमी होण्याच्या गोळ्या खाल्ल्या. फक्त आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देत त्याने नैसर्गिकरित्या आपले वजन करण्याचा निर्णय घेतला. विशेषतः आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीसाठी त्याने हा निर्णय घेतला. त्याचे हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्या शिकवते की वजन कमी करण्यासाठी फक्त शारीरिक बदल करून काही होणार नाही तर मानसिकदृष्ट्याही आपल्याही मजबूत आणि स्थैर्य व्हावं लागेल.५५ किलो वजन कमी करून त्याने अनेकांना प्रेरणा दिली आहे की घरी बसूनही काही नियम पाळून आपण आपले वजन कमी करू शकतो.
वजन कमी करण्याची पहिली स्टेप काय?
शरीरातील पोषण, शारीरिक हालचाल आणि किती तास झोप घेता यावर लक्ष द्या
वजन कमी करण्यासाठी उपवास करणे चांगले आहे का?
हो, वजन कमी करण्यासाठी उपवास हा एक प्रभावी मार्ग असू शकतो
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.