(फोटो सौजन्य: istock)
आजकलच्या बदलत्या जीवनशैलीत स्वतःला निरोगी ठेवणे फार कठीण पण महत्त्वाचे बनले आहे. चुकीची जीवनशैली, वाढते प्रदूषण यामुळे आपले आरोग्य बिघडत असते. आजकाल अनेकजण कमी वयातच अनेक आजरांनी ग्रस्त आहेत अशात आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे फार गरजेचे आहे. आपल्या लहान लहान चुका हे आपले आयुष्य कमी करत असतात. अनेकांना सकाळी उठताच दुधाचा चहा पिण्याची सवय आहे मात्र तुमची ही सवय तुमचे आयुष्य अनेक पटींनी कमी करत असते. खूप कमी लोकांना माहिती आहे की सकाळी दुधाचा चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की. दुधाच्या चहाऐवजी तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात आरोग्यदायी चहाने करू शकता. हे चहा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरतील आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यासही मदत करतील. चला सविस्तर जाणून घेऊया.
मोरिंगा चहा
मोरिंगाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. याचा चहा तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरेल. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी हा एक रामबाण उपायासारखा काम करेल. आता याचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम मोरिंगा पावडर घ्या, तुम्ही ही पावडर मोरिंगाची पाने वाळवन देखील तयार करू शकता. गरम पाण्यात ही पावडर ५-७ मिनिटे भिजत ठेवा आणि मग गाळून त्यात लिंबू पिळा. सकाळची सुरुवात तुम्ही या आरोग्यदायी चहाने करू शकता.
गोल्डन टर्मरिक लाटे
जुन्या काळापासून अनेक आजारांवर हळद एक रामबाण उपाय मानला जातो. तुम्ही दुधाच्या चहाऐवजी गोल्डन टर्मरिक लाटेचे सेवन करू शकता. यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात. याशिवाय हे यकृत डिटॉक्सिफाय करण्यास देखील उपयुक्त ठरते, ज्यामुळे यकृत निरोगी राहते. हे तयार करण्यासाठी सर्वप्रथम प्लांट बेस दूध घ्या. दूध गरम करून त्यात अर्धा चमचा हळद पावडर, चिमूटभर काळी मिरी आणि १/४ चमचा दालचिनी पावडर मिसळा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात मध देखील घालू शकता. सर्व साहित्य नीट मिक्स करा आणि मग याचा आस्वाद घ्या.
आले-लिंबाचा काढा
अनेक आजारांना पळवून लावण्यासाठी आपल्या घरात आल्याचा काढा तयार केला जातो. खरंतर या काढ्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे असतात. ते पचनक्रियेला सुधारते आणि नैसर्गिक ऊर्जा वाढवण्यास मदत करते. जर तुम्हाला पोटफुगीचा त्रास होत असेल तर हा काढा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आपल्या रोजच्या दिनचर्येत तुम्ही याचा समावेश करू शकता. आले लिंबाचा हा काढा तयार करण्यासाठी १ इंच किसलेले आलं, १ कप गरम पाण्यात मिसळा आणि मग त्यात लिंबाचा रस घाला घालून नीट मिसळून घ्या. तुमचा काढा तयार आहे, हळूहळू याचे सेवन करा.
माचा लाटे
सध्या माचा लाटेचा ट्रेंड फार वाढत चालला आहे. आपल्या आरोग्यसाठी हा चहा खूपच फायदेकारक ठरतो. मोठमोठे सेलेब्रिटीही या चहाचे सेवन करतात. हा चहा मनाला शांत करतो. त्यात असलेले एल-थियानिन ऊर्जा राखते. याच्या नियमित सेवनाने तुम्ही अनेक आजारांना आपल्यापासून दूर करू शकता. याला घरी बनवण्यासाठी प्रथम १ चमचा माचा पावडर, १ कप प्लांट बेस दुधात मिसळा आणि चांगलं फेटून मग त्याचे सेवन करा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात मधही मिसळू शकता.
जिरे-धणे-बडीशेप चहा
पचनाशी संबंधित समस्यांसाठी हा चहा खूप प्रभावी ठरतो. तुमचे जर तुमच्या रोजच्या दिनचर्येत याचा समावेश केला तर यामुळे तुमचे आतडे स्वच्छ होण्यास मदत होईल तसेच यामुळे चयापचय संतुलित राखण्यास मदत होते. हा चहा शरीरातील कमतरता दूर करण्यास मदत करतो. हा चहा तयार करण्यासाठी सर्वप्रथम चिमूटभर जिरे, धणे आणि एका जातीची बडीशेप घेऊन १ पाण्यात १० मिनिटे उकळत ठेवा आणि मग गाळून या चहाचे सेवन करा.
किडनी खराब होण्याच्या ‘या’ सुरुवातीच्या लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष; ताबडतोब गाठा हॉस्पिटल
नाश्त्यात पिण्यासाठी सर्वात चांगले पेय कोणते आहे?
आल्याची चहा, मॅचा ग्रीन टी.
सकाळी पिण्यासाठी सामान्य पेय कोणते आहे?
ज्यूस, कॉफी आणि चहा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.