Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल

Rakshabandhan: रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्याआधी, तुम्ही किफायतशीर आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून घरीच फेशियल करून पाहू शकता, ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि चमकदार होईल.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 24, 2026 | 11:49 AM
घरच्या घरी करा सोप्या पद्धतीने फेशियल (फोटो सौजन्य - iStock)

घरच्या घरी करा सोप्या पद्धतीने फेशियल (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • रक्षाबंधनाला मिळेल नैसर्गिक त्वचेची सुंदरता 
  • घरीच करा ५ स्टेप्समध्ये फेशियल 
  • नैसर्गिक घटकांचा वापर आणि उत्तम लुक 
Rakshabandhan: सण आणि विशेष प्रसंगी प्रत्येकाला चमकदार चेहरा हवा असतो. म्हणूनच सणासुदीच्या काळात ब्युटी पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचीच नाही तर अगदी पुरुषांचीही गर्दी असते. जर तुम्हाला पार्लरमध्ये जायचे नसेल आणि तुमच्या त्वचेला रासायनिक उत्पादनांची अ‍ॅलर्जी असेल, तर तुम्ही काही मूलभूत, नैसर्गिक घटकांचा वापर करून घरीच ५-स्टेप फेशियल करू शकता. यापैकी काही घटक घरात सहज उपलब्ध असतात.

घरी फेशियल करून तुम्ही चमकदार आणि नितळ त्वचा मिळवू शकता. तुम्हाला फक्त कोणते घटक वापरायचे आणि ते टप्प्याटप्प्याने कसे लावायचे हे माहित असणे आवश्यक आहे. चला, सविस्तर माहिती घेऊया.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधानाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वात्तम वेळ कोणती? जाणून घ्या

पहिला टप्पा आहे क्लिन्झिंग 

सर्वप्रथम, तुम्हाला तुमची त्वचा स्वच्छ करणे आवश्यक आहे. जरी तुम्ही तुमचा चेहरा आधीच धुतला असला तरी, डीप क्लिंझिंग म्हणजेच चेहऱ्याची खोलवर स्वच्छता करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही कच्चे दूध घ्या, त्यात कापसाचा बोळा बुडवा आणि तुमचा संपूर्ण चेहरा व मान स्वच्छ धुवा. यानंतर, हातावर थोडे दही घ्या आणि ते संपूर्ण चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर पाण्याने धुवा.

दुसरा टप्पा आहे एक्सफोलिएशन 

दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे Exfoliation. एक्सफोलिएशन म्हणजे त्वचा घासून स्वच्छ करणे. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील मृत पेशी काढण्यासाठी ओट्सचा वापर करू शकता, कारण ते त्वचेची छिद्रे हळुवारपणे स्वच्छ करते. यासाठी, १ चमचा जाडसर ओट्सची पावडर घ्या, त्यात मध मिसळा आणि थोडे कच्चे दूध किंवा गुलाबजल घाला. ते थोडे फुगण्यासाठी ५ मिनिटे तसेच ठेवा. आता ते तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा.

तिसरी पायरी म्हणजे फेशियल क्रीम मसाज

यासाठी, थोडे बदामाचे तेल किंवा ताज्या दुधाची साय कोरफडीच्या जेलमध्ये मिसळा. आता, त्याने तुमच्या मानेवर आणि संपूर्ण चेहऱ्यावर काही मिनिटे मसाज करा. जर तुम्हाला त्वचा मऊ वाटत नसेल, तर तुम्ही थोडे गुलाबजल वापरू शकता. यानंतर, एक टिश्यू पेपर पाण्यात भिजवा, तो हलकेच पिळून घ्या आणि तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.

Skin Care च्या नावाखाली केलेली एक चूक त्वचेसाठी ठरेल घातक! ‘या’ लोकांनी चुकूनही लावू नका फेसपॅक

चौथी स्टेप म्हणजे चेहऱ्याला Face Pack लावणे 

यासाठी तुम्ही एका भांड्यात मुलतानी माती, थोडे बेसन, चंदन पावडर, चिमूटभर हळद आणि गुलाबजल मिसळा. ते संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि हा फेसपॅक १०-१५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर, टिश्यूने पुसून टाका किंवा चेहरा धुवा.

शेवटचा टप्पा म्हणजे सीरम लावणे

फेशियलचा शेवटचा टप्पा म्हणजे सीरम लावणे. ते घरी तयार करण्यासाठी, कोरफडीचा गर घ्या आणि त्यात थोडे गुलाबजल मिसळा. त्यात एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि थोडे ग्लिसरीन घाला. ते संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. एक पातळ थर तयार करा आणि तो सुकू द्या. उरलेले सीरम तुम्ही एका बाटलीत साठवून नंतर वापरू शकता. यासह घरच्या घरी ५-टप्प्यांचे फेशियल पूर्ण होते.

Web Title: Rakshabandhan special 5 steps facial at home for glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Raksha Bandhan
  • rakshabandhan
  • Skin Care
  • skin care tips

संबंधित बातम्या

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश
1

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर
2

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर
3

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा
4

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.