आठवड्यातील ४ दिवस चेहऱ्यावर लावा 'हा' नॅचरल फेसपॅक, आलिया भट प्रमाणे त्वचेवर येईल चमकदार ग्लो
सगळ्यांचं अभिनेत्रींनप्रमाणे चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील पिंपल्स, सुरकुत्या, ऍक्ने, मुरूम घालवण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी फेसपॅक, फेसमास्क लावला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम लावून त्वचेची काळजी घेतली जाते. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या नॅचरल आणि नो-मेकअप लुकसाठी नेहमीच चर्चेत असते. कोणताही हेवी मेकअप न करता तिची त्वचा कायमच काचेसारखी नितळ, गुलाबी आणि चमकदार दिसते.आपल्यातील अनेकांना कायमच वाटत, अभिनेत्रीसुद्धा त्वचेची काळजी घेण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. पण असे नाही.आलिया भट सुंदर त्वचेसाठी घरगुती उपाय करते.(फोटो सौजन्य – pinterest)
आलिया भट स्किन केअर रुटीनमध्ये घरगुती आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर जास्त करते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा आलीय भट प्रमाणे गुलाबी गाल आणि नॅचरल लूक हवा असेल तर हजारो रुप्ये खर्च करून पार्लरला जाण्याची अजिबात गरज नाही. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही त्वचेवर चमकदार ग्लो मिळवू शकता. हा फेसपॅक आठवड्यातून ४ दिवस नियमित लावल्यास त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासोबतच चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल. याशिवाय चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग, काळे डाग आणि मुरूम कमी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया फेसपॅक बनवण्याची सोपी कृती.
Multani Mitti: चेहऱ्यावर मुलतानी माती लावताना काय काळजी घ्यावी, चेहऱ्यावर कायम दिसेल Glow
पपईमध्ये असलेले पपेन नावाचे एन्झाईम चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. मृत पेशी नष्ट झाल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि उजळदार होते. संत्र्याच्या सालीमध्ये असलेले विटामिन सी त्वचेवर आलेले काळे डाग घालवण्यास मदत करते. चेहऱ्यावरील काळे डाग, पिग्मेंटेशन दूर करण्यासाठी आठवड्यातून चार दिवस नियमित फेसपॅक तयार करून लावल्यास महिनाभरात त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार होईल. गुलाब पाण्याच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट राहते.






