फोटो सौजन्य - Social Media
आपण सर्वच आपले आवडते कलाकार मग ते महिला असोत की पुरुष यांचं अनुकरण करत असतो. विशेषतः महिलांमध्ये टीव्हीवर दिसणाऱ्या अभिनेत्रींसारखं दिसण्याची इच्छा जास्त असते. अनेकदा त्यांच्या मनात प्रश्न येतो, “वय वाढत असूनही या अभिनेत्री इतक्या तरुण कशा दिसतात?” त्यांच्यासारखं दिसण्यासाठी महिला वेगवेगळे ब्यूटी टिप्स व ट्रीटमेंट्स वापरतात. मात्र, या ट्रीटमेंट्समुळे खरंच स्किन तरुण आणि मऊ दिसते का, हे सांगणं कठीण आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे काही ट्रीटमेंट्स एका व्यक्तीस फायदेशीर ठरतात तर दुसऱ्याला त्रासदायक ठरू शकतात. आज आपण अशाच एका प्रसिद्ध फेशियलबद्दल जाणून घेणार आहोत, जे ऋचा चड्ढा पासून ते किम कार्दशियनपर्यंत अनेक अभिनेत्री करत असतात – ‘व्हॅम्पायर फेशियल’. यामुळे त्वचेला नैसर्गिक फायदे मिळतात आणि कोलेजनचं प्रमाण वाढतं.
व्हॅम्पायर फेशियल म्हणजे काय?
व्हॅम्पायर फेशियलला पीआरपी थेरपी (प्लेटलेट-रिच प्लाझ्मा थेरपी) असंही म्हटलं जातं. हे एक कॉस्मेटिक ट्रीटमेंट आहे जे त्वचेतील कोलेजन वाढवण्याचं काम करतं. कोलेजन हा शरीरातील एक महत्त्वाचा प्रोटीन आहे जो शरीरात ३०% प्रमाणात आढळतो. या फेशियलमुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि त्वचेच्या पेशींची गुणवत्ता सुधारते.
व्हॅम्पायर फेशियलचे फायदे
व्हॅम्पायर फेशियल कसं केलं जातं?
डॉ. पल्लवी पाठक यांनी सांगितल्याप्रमाणे, या ट्रीटमेंटसाठी सर्वप्रथम रुग्णाच्या रक्तातून प्लेटलेट्सयुक्त प्लाझ्मा वेगळा केला जातो. नंतर तो अगदी बारीक सुईंच्या मदतीने त्वचेमध्ये इंजेक्ट केला जातो. यामुळे कोलेजन निर्माण होण्याची प्रक्रिया वेगवान होते आणि त्वचेच्या नव्या पेशी निर्माण होतात. त्यामुळे त्वचा घट्ट, टवटवीत आणि तरुण दिसते.
खर्च आणि परिणाम किती काळ टिकतो?
या ट्रीटमेंटसाठी सुमारे ६० मिनिटे लागतात. याचा खर्च साधारणतः १०,००० ते १५,००० रुपयांदरम्यान असतो. फेशियलचा परिणाम सहसा ६ ते १२ महिने टिकतो, पण तो त्वचेनुसार वेगवेगळा असतो. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला न घेता कधीही हे ट्रीटमेंट करू नये. याचे काही साइड इफेक्ट्स देखील असू शकतात. थोडक्यात , जर तुम्ही देखील त्वचेला नैसर्गिक चमक देणाऱ्या ट्रीटमेंटचा विचार करत असाल, तर व्हॅम्पायर फेशियल हा एक पर्याय ठरू शकतो – पण तो अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.