
पिगमेंटेशन कमी होऊन चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल टोनर, त्वचा राहील फ्रेश
धावपळीच्या जीवनशैलीमुळे चेहऱ्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही. सतत काम आणि वाढत्या धावपळीमुळे आरोग्यासोबतच त्वचेच्या समस्या सुद्धा वाढू लागल्या आहेत. यामुळे चेहऱ्यावर डेड स्किन, टॅनिंग आणि पिगमेंटशन वाढून त्वचेच्या समस्या वाढू लागतात. काहीवेळा त्वचा खूप जास्त काळी होऊन जाते. त्वचेला योग्य पोषण न दिल्यामुळे त्वचा अधिक निस्तेज होऊन जाते आणि चेहऱ्यावरील ग्लो हरवतो. चेहऱ्यावर पिगमेंटशन येणे ही सामान्य समस्या असली तरीसुद्धा दुर्लक्ष केल्यास कालांतराने त्वचा खूप जास्त काळी होऊन जाते.त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी कायमच केमिकल प्रॉडक्ट आणि महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला जास्वदींच्या फुलाचा टोनर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे टोनर त्वचेवर गुलाबी ग्लो आणण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
Skin Care Tips: नॅचरल ग्लो हवाय? हजारो रुपयांच्या क्रीम्स विसरा! फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
टोनर बनवल्यानंतर शिल्लक राहिलेल्या फुलांची पेस्ट बनवून त्यात कोरफड जेल किंवा मध घालून मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. फेसपॅक १५ ते २० मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा आणि पाण्याने स्वच्छ धुवून टाका. चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो वाढवण्यासाठी जास्वदींच्या फुलांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. आठवड्यातून दोनदा किंवा दोनदा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास महिनाभरात फरक दिसून येईल.