
सकाळी उठल्यानंतर ३० दिवस उपाशी पोटी नियमित करा 'या' पाण्याचे सेवन, अपचन- जुनाट बद्धकोष्ठता कायमची होईल गायब
वजन कमी करण्यासाठी उपाय?
धणे जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे?
अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी उपाय?
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. याशिवाय सतत जंक फूडचे सेवन, तिखट तेलकट पदार्थ, पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम दिसू लागतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या कायमच उद्भवतात. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे ऍसिडिटी वाढते आणि छातीत जळजळ, घशात जळजळ, आंबट ढेकर, उलट्या, मळमळ, डोकेदुखी इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या आणि महागड्या सप्लिमेंटचे सेवन केले जाते. पण असे न करता स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून हेल्दी ड्रिंक तयार करून प्यायल्यास ३० दिवसांमध्ये अपचनाच्या समस्या गायब होतील. बद्धकोष्ठता, अपचनाच्या समस्येवर घरगुती उपाय.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार ऍसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा अपचनाची समस्या उद्भवत असेल तर जिरं आणि धणेचे पाणी प्यावे. प्रत्येक स्वयंपाक घरात जिरं आणि धणे असतात. जिऱ्याचा वापर फोडणी देण्यासाठी केला जातो तर धणे मसाला बनवताना वापरले जातात. हे दोन्ही पदार्थ शरीराची बिघडलेली पचनसंस्था सुधारतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जिरं धणेचे पाणी प्यायल्यास आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. धण्यामध्ये नैसर्गिक तंतू आणि अँटी ऑक्सिडंट्स घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. जिरं खाल्ल्यामुळे पचनरसांची निर्मिती वाढवते आणि अन्न नीट पचण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर धणे जिऱ्याचे पाणी प्यायल्यास हळूहळू पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल आणि अपचनाचा त्रास होणार नाही.
धणे जिऱ्याचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा धणे टाकून पाणी उकळवून घ्या. टोपातील पाणी उकळवून अर्धा झाल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी गाळून कोमट झाल्यानंतर प्या. यामुळे सकाळीच पोट व्यवस्थित स्वच्छ होईल आणि आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल. धणे जिऱ्याचे पाणी पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करून चयापचयाची गती वाढवतात. जिऱ्याचे पाणी शरीरातील अतिरिक्त पाणी धरुन ठेवण्याची सवय कमी करतात, ज्यामुळे पोटाला सूज किंवा पोटात जडपणा जाणवत नाही.वाढत्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी धणे जिऱ्यापासून बनवलेले पाणी प्यावे.
Health Care Tips : गाढ झोपेत असताना तोंडातून लाळ गळते ? यामागे नेमकं कारण काय , जाणून घ्या
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. सतत गोळ्या औषध. महागडे सप्लिमेंट्स, डाएट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी कोणतेही महागडे उपाय करण्याऐवजी धणे जिऱ्याचे पाणी प्यावे. यामुळे ३० दिवसात पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल.
Ans: छातीच्या मध्यभागी किंवा गळ्याच्या आसपास जळजळ.
Ans: जास्त मसालेदार, तिखट, तळलेले आणि स्निग्ध पदार्थ खाणे
Ans: लिंबूवर्गीय फळे (संत्रे, लिंबू), टोमॅटो आणि कांदा