फोटो सौजन्य: गुगल
गाढ झोपेत असताना तोंडातून लाळ गळणे (Drooling) ही अनेकांना जाणवणारी सामान्य समस्या आहे. ही कोणती गंभीर समस्या नाही पण शारीराच्या चुकीच्या सायकलीचा हा झालेला परिणम आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अपुरी झोप.
आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दिवसभरातील कामामुळे शरीर आणि मेंदू थकतो. रात्रीच्या वेळी शरीराला झोपेची खूप गरज असते. आणि याच नादात अनेक झोपण्याची स्थिती चुकते. खूप जण असे आहेत ज्यांना रात्रीच्या झोपेत कुशीवर किंवा पोटावर झोपण्याची सवय असते त्यामुळे देखील तोंडातून लाळ गळते.
अॅलर्जीमुळे अनेकांना सर्दी आणि सायनसचा त्रास जास्त होतो. या मंडळींना रात्री झोपताना श्वास घ्यायला अडथळा होतो. याचकारणाने तोंड उघडं ठेवलं जातं. यामुळे लाळ गळते आणि उशी ओली होते. काही वेळा आम्लपित्त, पचनाचे विकार किंवा जास्त तिखट-तेलकट आहार घेतल्यानेही लाळेचे प्रमाण वाढते.
काही औषधांचे साइड इफेक्ट, दात किंवा हिरड्यांचे आजार, घशाची सूज यामुळेही झोपेत लाळ गळण्याची समस्या उद्भवू शकते. लहान मुलांमध्ये दात येण्याच्या काळात किंवा खोल झोपेमुळे लाळ गळणे हे अगदी नैसर्गिक मानले जाते.मात्र, जर लाळ गळणे रोजच आणि जास्त प्रमाणात होत असेल कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
प्राथमिक उपचार म्हणून तुम्ही पाठीवर झोपण्याची सवय लावणं, झोपण्यापूर्वी जड जेवण टाळणं, नाक स्वच्छ ठेवणं, सर्दी-सायनसवर उपचार घेणं आणि तोंड-दातांची योग्य स्वच्छता राखणं उपयुक्त ठरतंं. थोडक्यात सांगायचे तर, कधीतरी गाढ झोपेत लाळ गळणे हे सामान्य असले तरी सतत होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






