सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सोनाक्षी 23 जून 2024 रोजी झहीरसोबत लग्न करणार असल्याचे सध्या वृत्त आहे आणि सोशल मीडियावरदेखील दोघांची लगबग दिसून येत आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्याचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. हे दोघे ७ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिले गेले आहे.
मात्र लग्न हा असा एक निर्णय आहे जो घाईघाईने घेऊ नये परंतु काळजीपूर्वक विचार करून घेतला पाहिजे. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नामध्ये सर्वात मोठा फरक आहे तो धर्माचा. अनेकदा वेगळ्या धर्माच्या किंवा जातीच्या व्यक्तीशी लग्न केल्याने तेथील चालीरीती, राहणीमान हे सर्वच वेगळे असतात. अशा परिस्थितीत कधी कधी नाती फार काळ टिकत नाहीत. पण, सोनाक्षी आणि झहीरच्या नात्यातून तुम्ही काही टिप्स घेऊ शकता की, वेगवेगळ्या धर्माचे असूनही तुम्ही तुमच्या नात्यात प्रेम, आपुलकी आणि विश्वास टिकवून ठेवू शकता.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे धर्म भिन्न आहेत. दोघांची संस्कृती, पार्श्वभूमी, चालीरीती, खाद्यपदार्थ, कपडे घालण्याची पद्धत हे सर्वच वेगवेगळे असले तरी त्यांचे नाते अत्यंत घट्ट असल्याचे दिसून येते. खरंतर या सगळ्या गोष्टींची दोघांनाही पर्वा नाही. दोघेही एकमेकांचा आदर करतात आणि एकमेकांना जसेच्या तसे स्वीकारतात. त्यामुळे नातं टिकविण्यासाठी तुम्ही जसे आहात तसे स्वीकारणे गरजेचे आहे.
सोनाक्षी आणि झहीरकडून घ्या नात्यातील टिप्स (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
कोणतेही नाते यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमचे नाते खाजगी ठेवणे महत्वाचे आहे. लोकांसमोर जास्त न येणे अथवा नात्यांमधील चढउतार सर्वांसमोर न दाखवणे हे नातं अधिक घट्ट बनवते. तुमच्या नात्याबद्दल इतरांशी विनाकारण बोलू नका. तुमचे नाते खरे असेल तर ते हळूहळू आपोआप घट्ट होत जाते. जितके ते खासगी ठेवाल तितका त्यातील समंजसपणा अधिक असतो.
सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांच्या नात्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते नेहमी एकमेकांना सपोर्ट करतात. नात्यात एकमेकांशी कनेक्टेड राहणं अत्यंत गरजेचे आहे. सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांच्या फोटोंवर कमेंट्स करणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा मनापासून देणे हे सर्वच दोघेही करतात. जेव्हा सोनाक्षी नवीन प्रोजेक्टवर काम करते तेव्हा आम्ही तिला शुभेच्छा देतो आणि पाठिंबा देतो. ज्या नात्यात तुम्ही बांधलेले आहात किंवा बांधणार आहात त्या नात्याला जर तुम्ही आधार दिलात तर नातं आणखी घट्ट होईल.
झहीर-सोनाक्षी (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
जेव्हा तुम्ही एकमेकांना पुरेसा वेळ देता तेव्हा नाते अधिक घट्ट होते. एकमेकांना अधिक समजून घ्या. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल नेहमीच एकत्र दिसतात. ते नेहमी एकत्र असतात आणि दर्जात्मक वेळ घालवतात. कोणत्याही पार्टीत किंवा फंक्शनला गेलात तर एकटे जाऊ नका तर एकत्र जा. धर्म, जात, चालीरीती, सण वेगळे असतील, पण एकत्र साजरे करा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.
अनेकदा दोघंही आपापल्या मजेशीर क्षणांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. हे त्यांचे एकमेकांबद्दलचे दृढ बंध आणि आपुलकी दर्शवते. जोडपे म्हणून एकत्र मजा करून आणि आठवणी जपून निरोगी नाते टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही या दोघांकडून शिकू शकता.
त्यामुळे धर्म, जात वेगळी असली तरीही नातं आणि हे प्रेम हे महत्त्वाचं असतं. या दोघांच्या नात्यातून तुम्हीही हेच शिकू शकता.