Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागडी क्रीम नको! तांदळाच्या पाण्यापासून घरच्या घरी बनवा नाईट क्रीम; चेहरा दिसेल तजेलदार

Rice Water Night Cream for Glowing Skin: धूळ आणि प्रदूषण यामुळे त्वचा डल झालीये, मग तांदळाच्या पाण्यापासून घरीच्या घरी बनवा ही नाईट क्रिम नक्की बनवा, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 30, 2026 | 07:14 PM
महागडी क्रीम नको! तांदळाच्या पाण्यापासून घरच्या घरी बनवा नाईट क्रीम; चेहरा दिसेल तजेलदार
Follow Us
Follow Us:
  • तांदळाच्या पाण्यापासून घरच्या घरी बनवा नाईट क्रीम
  • तांदळाच्या पाण्याचे त्वचेसाठी फायदे
  • नाईट क्रीम बनवण्याची पद्धत
दिवसभर धूळ, प्रदूषण, ऊन आणि ताण यांचा सर्वाधिक परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. अनेकजण मार्केटमधील महागडी नाईट क्रीम वापरतात. मात्र येवढे पैसै खर्च न करता तुम्ही घरच्या घरी उपलब्ध असलेल्या तांदळाच्या पाण्यापासूनही एक नैसर्गिक नाईट क्रीम तयार करु शकता. तांदळाच्या पाण्यात त्वचेसाठी उपयुक्त अँटिऑक्सिडंट्स, अमिनो अॅसिड्स आणि काही जीवनसत्त्वे असतात, जी त्वचेला पोषण देण्यास मदत करतात. नाईट क्रिम कशी तयार करायची, जाणून घ्या.

Motion Sickness: प्रवासात मळमळ आणि उलटीचा त्रास होतो? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा ट्राय

तांदळाच्या पाण्याचे त्वचेसाठी फायदे

तांदळाचे पाणी त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. याशिवाय, नियमित तांदळाच्या पाण्याचा वापर केल्यास त्वचा अधिक मऊ, तजेलदार आणि ताजी दिसण्यास मदत होऊ शकते. तसेच त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासही याचा उपयोग होऊ शकतो.

नाईट क्रीम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • अर्धा कप तांदळाचे पाणी
  • १ चमचा अॅलोवेरा जेल
  • १ व्हिटॅमिन-ई कॅप्सूल
  • १ चमचा ग्लिसरीन

नाईट क्रीम बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून त्याचे पाणी वेगळे काढा. एका स्वच्छ भांड्यात तांदळाचे पाणी घ्या. त्यात अॅलोवेरा जेल, व्हिटॅमिन-ई कॅप्सूलमधील तेल आणि ग्लिसरीन घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. तयार क्रीम स्वच्छ, हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.

वापरण्याची योग्य पद्धत

रात्री चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवून कोरडा करा. त्यानंतर नाईट क्रीम चेहरा आणि मानेवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. क्रिम रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका.

वापरताना घ्या ही काळजी

  • कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
  • त्वचेवर जखम, संसर्ग किंवा तीव्र अॅलर्जी असल्यास क्रिम लावू नका.
  • तयार केलेले क्रीम जास्तीत जास्त १ आठवडा वापरा आणि नेहमी स्वच्छ चमच्यानेच काढा.
  • त्वचेला सतत त्रास होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Perfume Side Effects: अतिप्रमाणात परफ्यूम वापरताय? मग सावधान! शरीरावर होऊ शकतात ‘हे’ परिणाम

Web Title: Rice water night cream homemade skin care glowing skin tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • how to get glowing skin
  • rice water
  • skin care tips

संबंधित बातम्या

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
1

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
2

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
3

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.