
मासिक पाळीच्या तीव्र वेदना कायमच्या होतील गायब! दैनंदिन आहारात नियमित खा 'हे' पौष्टिक पदार्थ, फायब्रॉईडच्या गाठी जातील वितळून
पाळीतील वेदना कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहार.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये कोणते पदार्थ खाऊ नये?
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात वेदना का होतात?
सर्वच महिलांना महिन्यातील चार ते पाच दिवस मासिक पाळी येते. हा शरीरातील नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे. मासिक पाळी आल्यानंतर स्त्रीच्या गर्भाशयाचे अस्तर योनीमार्गातून रक्तस्त्रावाच्या रूपात बाहेर पडते. साधारणपणे १२ ते १३ वयाच्या मुलींमध्ये मासिक पाळी सुरु होते आणि ४५ ते ५० व्या वर्षी मासिक पाळी बंद होते. या दिवसांमध्ये महिलांना प्रचंड शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. कंबर दुखणे, ओटीपोटात वेदना होणे, उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी बऱ्याचदा महिला पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करतात. पण या गोळ्या वारंवार खाल्ल्यास गर्भाशयाला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
मासिक पाळी आल्यानंतर गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात, ज्याच्या परिणामामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. याशिवाय मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात प्रोस्टाग्लँडिन्स नावाचा घटक तयार होतो, ज्यामुळे सूज आणि वेदना वाढतात. रक्तभिसरण सुरळीत चालू नसल्यामुळे पाळीच्या दिवसांमध्ये खूप जास्त वेदना होतात. तर गर्भाशयात वाढलेल्या फायब्रॉईडच्या गाठी वेदना अधिक तीव्र करतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये आहारात शरीरास सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ नियमित खाल्ल्यास वेदनांपासून कायमची सुटका मिळेल.
स्नायूंना शिथिल करण्यासाठी शरीराला वेगवेगळ्या पोषक घटकांची आणि जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. पालक आणि मेथीमध्ये लोह आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे स्नायूंचे आकुंचन कमी होते आणि वेदना होत नाहीत. पोटॅशियम युक्त केळी नियमित खाल्ल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. अननसामध्ये ब्रोमेलिन असते, ज्यामुळे गर्भाशयाचे स्नायू शिथिल होण्यास मदत होते. तसेच मासिक पाळी आल्यानंतर पोटात तीव्र वेदना होत असतील तर आल्याचा चहा प्यावा. आल्याचा चहा प्यायल्यामुळे पोटात वाढलेल्या कळा आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी केशर आणि काळ्या मनुका भिजवून खाल्ल्यास ओटीपोटात वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होते.
Kitchen Garden Tips: पावसाळ्यापूर्वी किचन गार्डनमध्ये लावा या भाज्या, आरोग्यासाठी ठरतील उत्तम
दैनंदिन आहारातील काही पदार्थ शरीरात इन्फ्लेमेशन वाढवतात, ज्यामुळे वेदना होण्याची शक्यता असते. जास्त मिठाचे सेवन करणे शरीरासाठी घातक आहे. यामुळे शरीरात पाणी साचून राहते आणि शरीराला सूज येण्याची शक्यता असते. कॅफिनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि ओटीपोटात ताण वाढतो, ज्याच्या परिणामामुळे वेदना वाढण्याची शक्यता असते. तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थ शरीरात गॅस आणि अपचनाच्या समस्या वाढवतात.
Ans: मासिक पाळीदरम्यान गर्भाशयाच्या आकुंचनामुळे वेदना होऊ शकतात. हार्मोन्समधील बदल, एंडोमेट्रिओसिस किंवा फायब्रॉईडसारख्या समस्यांमुळे काही महिलांना अधिक त्रास होऊ शकतो.
Ans: फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये तयार होणाऱ्या सामान्यतः कॅन्सर नसलेल्या गाठी आहेत. काही महिलांमध्ये यामुळे जास्त रक्तस्राव, पोटदुखी किंवा मासिक पाळीच्या वेळी त्रास होऊ शकतो.
Ans: हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, सुका मेवा, प्रथिनेयुक्त पदार्थ आणि लोह व कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो.