किचन गार्डनमध्ये कोणत्या भाज्या पावसाळ्यापूर्वी लावाव्या (फोटो सौजन्य - Pinterest)
भोपळ्याचे वेल ठरतील उत्तम
भोपळा ही अशी भाजी आहे ज्याची वेल उष्णता आणि आर्द्रता या दोन्हीमध्ये चांगली वाढते. पावसाळ्यापूर्वी पेरणी केल्यास, पाऊस सुरू होताच रोपे वेगाने पसरतात. कमी जागेतही चांगले रोप लागते आणि चांगले उत्पन्न मिळते.
ताजीतवानी भेंडीही लवकर उगवते
भेंडी ही अशी एक भाजी आहे जी उष्ण आणि दमट हवामानात चांगली वाढते. ती कुंड्यांमध्ये किंवा छोट्या किचन गार्डनमध्ये सहजपणे वाढवता येते. भेंडी सुमारे दीड ते दोन महिन्यांत काढणीसाठी तयार होते. त्यामुळे ही भाजी नक्की तुम्ही पेरू शकता
Gardening Tips: घरात तिखट हिरव्या मिरचीची लागवड कशी करावी, सोप्या टिप्स
काकडीचे वेलही लवकर तयार होतील
उन्हाळा आणि पावसाळ्यात काकडीची मागणी वाढते. पावसाळ्यापूर्वी लावलेली काकडीची रोपे पुरेशा ओलाव्यामुळे वेगाने वाढतात. नियमित पाणी आणि सूर्यप्रकाशामुळे चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे तुम्ही आता काकडीचे वेल लाऊ शकता. याशिवाय आपल्या जेवणात कोशिंबीरसाठी काकडी असणे उत्तम ठरते. आरोग्यासाठीही काकडी नियमित खाणे फायदेशीर ठरते.
हिरवी मिरची रोप
हिरव्या मिरचीची रोपे जवळजवळ वर्षभर लावता येतात, परंतु पावसाळ्यापूर्वी लावलेली रोपे लवकर वाढतात. एकदा रोपे तयार झाली की, ती अनेक महिने ताज्या मिरच्या देतात. घरीच तुम्ही मिरच्यांची लागवड सोप्या पद्धतीने करू शकता. याशिवाय बाजारच्या सुकलेल्या मिरच्या वापरण्यापेक्षा घरच्या मिरच्यांचा वापर उत्तम होतो.
घरच्या घरी किचन गार्डन बनवायचे असेल तर या गार्डनिंग टिप्स वापरा
वांगंही ठरेल फायदेशीर
याशिवाय वांग्याच्या रोपांना हलका ओलावा आणि पुरेसा सूर्यप्रकाश आवडतो. पावसाळ्यापूर्वी तुम्ही घरीच वांग्याची रोपं लावा. रोपे वेगाने वाढतील आणि पावसाळ्यात चांगले पीक देतील. वांग्याचं भरीत, वांग्यांची भाजी, काप हे सर्व करण्यासाठी घरातील किचन गार्डनमधील ताजी वांगी नक्कीच अप्रतिम ठरतील.
यासाठी कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात जाणून घ्या






