Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उपाशी पोटी थंड की गरम पाणी प्यावे? डॉ. हंसा योगेंद्र यांनी सांगितलेले ‘हे’ पाणी ठरेल शरीरासाठी प्रभावी

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नेमके कोणते पाणी प्यावे? असे प्रश्न सगळ्यांचं कायम पडतात. उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 21, 2025 | 05:30 AM
सकाळी उपाशी पोटी थंड की गरम पाणी प्यावे?

सकाळी उपाशी पोटी थंड की गरम पाणी प्यावे?

Follow Us
Follow Us:

सकाळी गरम की थंड पाणी प्यावे?
दिवसभरात किती लीटर पाणी प्यावे?
गरम पाण्याचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे?

मानवाला जीवन जगण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. अन्न, पाणी आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. अन्नपदार्थांचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते तर पाण्याचे सेवन केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते. किडनी, आतड्या, लिव्हर आणि शरीराच्या इतर अवयवांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. दिवसभरात नियमित २ ते ३ लीटर पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच दीर्घकाळ निरोगी राहते. कायमच हेल्दी आणि मजबूत राहण्यासाठी अन्नपदार्थांचे सेवन करण्यासोबतच पाणी पिणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. काहींना थंड पाणी पिण्याची सवय असते तर काहींना कोमट किंवा गरम पाणी पिण्याची सवय असते.(फोटो सौजन्य – istock)

आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी प्रेमानंद महाराजांचा ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, जुनाट बद्धकोष्ठतेपासून मिळेल कायमची सुटका

दिवसभरात कमी पाण्याचे सेवन केल्यास शरीर डिहायड्रेट होऊन आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. कमी पाण्याच्या सेवनामुळे लघवी करताना वेदना होणे, ऍसिडिटी, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा इत्यादी समस्या उद्भवू लागतात. सकाळी झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात आधी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. पण कायमच सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे उपाशी पोटी कोणत्या पाण्याचे सेवन करावे? थंड की गरम पाणी प्यावे? याबद्दल प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी सविस्तर माहिती सांगणार आहे. चला तर जाणून घेऊया.

प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी सांगितल्यानुसार, सकाळी उठल्यानंतर वयस्कर व्यक्तींनी अंदाजे 250 ते 500 मिली पाणी पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे केवळ शरीर हायड्रेटचं नाही तर पचनक्रिया सुधारण्यास सुद्धा मदत होते. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील हानिकारक टॉक्सिन बाहेर पडून जातात. यामुळे मन आणि शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते.

गरम की थंड कोणते पाणी प्रभावी?

योगगुरूनी सांगितल्यानुसार, पाण्याचे तापमान सुद्धा शरीरासाठी गुणकारी ठरते. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे अतिशय प्रभावी ठरते. तसेच तुम्ही नॉर्मल खोलीमधील तापमानातील पाणी पिऊ शकता. रात्रीच्या झोपेमुळे शरीर हायड्रेट होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करावे.कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. पण जर तुम्ही सकाळी उठून थंड पाण्याचे सेवन केले तर पोटाची हालचाल अतिशय मंदावते.

गारव्यामुळे सतत सर्दी खोकला होतो? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ पारंपरिक उपाय ठरेल शरीरासाठी प्रभावी, घशातील खवखव होईल दूर

अशा प्रकारे सकाळी उठून करा पाण्याचे सेवन?

  • पाणी पिण्यासाठी ग्लासचा वापर करावा.
  • पाणी पिण्याआधी दात घासू नये, यामुळे पचनक्रिया सुधारते.
  • पाणी कायमच बसून प्यावे, उभे राहून नाही.
  • त्वचेवर चमकदार ग्लो मिळवण्यासाठी पाण्यात लिंबू, पुदिना, काकडी किंवा आल्याचे तुकडे घालून पिऊ शकता. यामुळे शरीर विषमुक्त होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाणी कधी प्यावे?

    Ans: काहीही खाण्यापूर्वी एक ते दीड तास आधी किंवा जेवणानंतर एक तासाने पाणी पिणे चांगले आहे.

  • Que: थंड किंवा गरम पाणी?

    Ans: सामान्य खोलीच्या तापमानाला पाणी पिणे उत्तम आहे.

  • Que: पाणी पाण्याचे फायदे?

    Ans: शरीरातील प्रत्येक प्रणाली, पेशी आणि अवयवांच्या योग्य कार्यासाठी पाणी आवश्यक आहे.

Web Title: Should you drink cold or hot water on an empty stomach in the morning dr hansa yogendra said this water will be effective for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • digestion
  • drinking water tips
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी
1

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी

जेवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो किडनी स्टोनचा धोका, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास लघवीवाटे वाहून जाईल मुतखडा
2

जेवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो किडनी स्टोनचा धोका, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास लघवीवाटे वाहून जाईल मुतखडा

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
3

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

Weight Loss: पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी! भूक लागल्यानंतर ‘या’ पदार्थांचे आवर्जून करा सेवन, राहाल कायमच फीट
4

Weight Loss: पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी! भूक लागल्यानंतर ‘या’ पदार्थांचे आवर्जून करा सेवन, राहाल कायमच फीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.