आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी प्रेमानंद महाराजांचा 'हा' उपाय ठरेल प्रभावी
बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय?
आतड्यांमध्ये घाण साचून राहण्याची कारणे?
बद्धकोष्ठतेचा लक्षणे?
धावपळीची जीवनशैली, अपुरी झोप, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर अनेक बदल दिसून येतात. गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी इत्यादी समस्या प्रामुख्याने उद्भवू लागतात. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवथित पचन झाल्यामुळे आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते, ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.बद्धकोष्ठता झाल्यानंतर वारंवार पोटात दुखणे, कामात लक्ष न लागणे, चीडचडेपणा इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. वारंवार होणाऱ्या ऍसिडिटी किंवा अपचनाच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. पोटात वाढलेल्या लहानशा वेदना कालांतराने गंभीर आजारांचे कारण बनतात. बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लता यासारख्या समस्या पोट, आतड्या आणि संपूर्ण शरीराचे गंभीर नुकसान करतात.(फोटो सौजन्य – istock)
बद्धकोष्ठतेची समस्या वाढल्यानंतर शरीरातील विषारी घाण सहज बाहेर पडून जात नाही. आतड्यांमध्ये मल तसाच चिकटून राहतो. पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे आतड्यांसोबतच शरीराच्या नाजूक अवयवनाचे नुकसान होते. पोटात साचून राहिलेली घाण शरीरासंबंधित गंभीर आजारांचा जन्म देते. त्यामुळे आतड्यांमधील विषारी घटक बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले काही प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय नियमित केल्यास शरीर स्वच्छ होईल.
प्रेमानंद महाराजांनी सांगितल्यानुसार, सकाळी उठल्यानंतर फॉलो केल्या जाणाऱ्या सवयी शरीराचे आरोग्य कसे राहील हे ठरवते. बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी उठल्यानंतर सगळ्यात आधी देवांचे दर्शन घ्यावे. त्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करावे. तसेच तुमच्या क्षमतेनुसार, वज्रासनात बसून अर्धा लिटर किंवा शक्य होईल तेवढ्या प्रमाणात पाणी प्यावे. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते.
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. आतड्यांमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाणी प्रभावी ठरते. कोमट पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांमधील मल मऊ होऊन सहज बाहेर पडून जातो. तसेच शरीराला तात्काळ ऊर्जा देण्यासाठी कोमट पाण्याचे सेवन करावे. बद्धकोष्ठता, वायू आणि जडपणासारख्या समस्या दूर करण्यासाठी कोमट पाणी प्यावे.
दैनंदिन आहारात कायमच तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. आहारात डाळभात, भाजी चपाती, दही, फळे, ताज्या भाज्या, पालेभाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला कधीच गंभीर आजारांची लागण होणार नाही. याशिवाय पचनक्रिया सुद्धा निरोगी राहील. सकाळी ऊठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्यास पोटात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातील.
शरीर स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास करणे आवश्यक आहे. उपवास केल्यामुळे पोटाला आराम मिळतो. वारंवार बद्धकोष्ठता वाढत असेल तर तीन ते चार दिवस उपवास करावा. उपवासात मूगडाळीपासून बनवलेले पदार्थ खावेत. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो. जड, तळलेले किंवा मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नये.
Ans: आठवड्यातून तीनपेक्षा कमी आतड्याची हालचाल होणे, कठीण आणि कोरडे शौच होणे किंवा शौचासाठी खूप ताण येणे
Ans: आहारात फायबरची कमतरता.
Ans: तोंडात अन्न चावल्यानंतर लाळ मिसळते, ज्यामुळे अन्नाला ओलसरपणा येतो आणि ते अन्ननलिकेतून पोटात जाते.






