गारव्यामुळे सतत सर्दी खोकला होतो? मग आजीबाईच्या बटव्यातील 'हा' पारंपरिक उपाय ठरेल शरीरासाठी प्रभावी
थंडीच्या दिवसांमध्ये वारंवार सर्दी खोकला का होतो?
खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत?
घशातील वेदनांवर आयुर्वेदिक उपाय?
देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला खूप जास्त हानी पोहचते. थंड वातावरणामुळे काहींना वारंवार सर्दी, खोकला होणे, घशात वाढलेली खवखव, साथीचे आजार इत्यादी आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे हिवाळ्यात शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. हवेतील गारठा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करून टाकतो. तसेच या हंगामात शरीराला आजारांची पटकन लागण होते. हिवाळ्यात वाढलेल्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी कायमच गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक आणि घरगुती उपाय करून आराम मिळवावा. आयुर्वेदिक उपाय सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवून देतात. यासोबतच शरीराला भरमसाट फायदे सुद्धा होतात.(फोटो सौजन्य – istock)
हिवाळ्यात सगळ्यांचं कायम सर्दी, खोकला, घशात वाढलेल्या वेदना इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय केल्यामुळे शरीरावर कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नाही. आलं, हळद, तुळस, मध इत्यादी अनेक पदार्थ कायमच शरीरासाठी प्रभावी ठरतात. सर्वच स्वयंपाक घरात हळद, आलं, मध इत्यादी पदार्थ कायमच उपलब्ध असतात. या पदार्थांच्या सेवनामुळे हंगामी आजारांपासून सुटका मिळते. यासोबतच घशात वाढलेली खवखव, सर्दी, खोकला कमी होऊन जातो.
थंडीत लहान मोठ्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करावा. मोठ्या चमचा घेऊन त्यात काळीमिरी पावडर, काळे मीठ आणि मध घालून मिक्स करा. चमचा गॅसवर हलकासा गरम करून त्यात केलेले चाटण मिक्स करून घ्या. मधाचे सेवन केल्यामुळे घशात वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होईल, तसेच यामध्ये असलेले औषधी गुणधर्म खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवून देतात. काळ्या मिठाच्या सेवनामुळे घशात वाढलेली खवखव लगेच कमी होते आणि आराम मिळतो. घसा स्वच्छ ठेवण्यासाठी काळीमीरीचे सेवन करावे. काळीमिरीच्या सेवनामुळे घशात जमा झालेली विषाणू नष्ट होऊन जातात. हे चाटण शक्यतो उपाशी पोटी घ्यावे. उपाशी पोटी खाल्ले पदार्थ शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात. तसेच खोकल्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रभावी ठरते.
मासिक पाळीपूर्वी वा नंतर होत असेल ‘White Discharge’, तज्ज्ञांकडून जाणून घ्या नॉर्मल आहे की नाही
घशात वारंवार येणाऱ्या खोकल्यामुळे बारीक जखमा होण्याची शक्यता असते. या जखमांपासून आराम मिळवण्यासाठी मधाचे सेवन करावे. तसेच काळीमिरी खाल्ल्यामुळे घशाला आलेली सूज कमी होते. छातीत साचून राहिलेल्या कफापासून सुटका मिळवण्यासाठी आणि खोकला कमी करण्यासाठी काळीमिरी पावडरचे सेवन करावे. काळ मीठ घशात वाढलेली खवखव दूर करते.
Ans: सर्दी आणि फ्लू दोन्ही विषाणूजन्य संसर्ग आहेत, परंतु फ्लूची लक्षणे सहसा अधिक गंभीर असतात.
Ans: आहारात शरीराला आतून उबदार ठेवणाऱ्या पदार्थांचा समावेश करा, जसे की सूप, हळदीचे दूध, आणि आले-काळ्या मिरीचा चहा.
Ans: घसादुखीपासून आराम मिळण्यासाठी कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.






