Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी
Recipe : तुम्हीही श्रावणी सोमवारचा उपवास पकडला असेल आणि भगवान शिवाच्या पूजेत गोड पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर तांदळाची खीर एक चांगला पर्याय ठरेल. स्वयंपाकघरातील निवडक साहित्यांपासून ही घट्टसर तांदळा
Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी
Follow Us
Follow Us:
तांदळाची खीर एक पारंपारिक गोडाचा पदार्थ आहे.
श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी हा पदार्थ बनवला जाऊ शकतो.
घरी उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यांपासून ही खीर बनवता येते.
श्रावणातीलसोमवार हा भगवान शिवाची भक्ती आणि उपासनेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि देवाला नैवेद्य म्हणून सात्त्विक पदार्थ तयार करतात. उपवासाच्या दिवशी गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर तांदळाची खीर हा एक सोपा आणि पारंपरिक पर्याय ठरतो. दूध, तांदूळ, साखर आणि वेलची यांसारख्या साध्या साहित्यापासून ही खीर तयार करता येते. मंद आचेवर दूध आणि तांदूळ शिजवल्यामुळे खिरीला छान घट्टपणा आणि चव मिळतो. घरच्या घरी कमी वेळात तयार होणारी ही खीर नैवेद्यासाठीही योग्य आहे आणि जेवणानंतर गोड पदार्थ म्हणूनही खाल्ली जाऊ शकते. चला तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यातील पाणी पूर्णपणे काढून तांदूळ काही मिनिटे बाजूला ठेवा.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात धुतलेला तांदूळ घाला. मंद आचेवर तांदूळ हलका परतून घ्या. यामुळे खिरीला छान सुगंध येतो.
आता पातेल्यात दूध घाला आणि मिश्रणाला उकळी येऊ द्या. त्यानंतर गॅस मंद करा. तांदूळ पूर्णपणे मऊ होईपर्यंत खीर मंद आचेवर शिजू द्या. तळाला लागू नये म्हणून मधूनमधून ढवळत राहा.
तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात साखर घाला. साखर विरघळेपर्यंत खीर चांगली ढवळा. साखर घातल्यानंतर खीर थोडी पातळ होईल, त्यामुळे काही मिनिटे पुन्हा मंद आचेवर शिजवा.
काजू आणि बदाम बारीक चिरून खिरीत घाला. त्यासोबत मनुका आणि केशरही मिसळा. केशर वापरत असल्यास ते थोड्या कोमट दुधात भिजवून घातल्यास रंग आणि सुगंध चांगला येतो.
शेवटी वेलची पूड घाला आणि खीर आणखी 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर शिजवा. खीर चमच्याला किंचित घट्ट लागली की गॅस बंद करा.
तयार तांदळाची खीर थोडी कोमट होऊ द्या. त्यानंतर ती वाटीत काढून वरून काजू-बदाम आणि केशराने सजवा.
श्रावणी सोमवारच्या दिवशी भगवान शिवाला नैवेद्य दाखवून ही स्वादिष्ट खीर प्रसाद चांगला पर्याय ठरेल.
Web Title: Shravni somwar special rice kheer recipe in marathi