Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हीसुद्धा रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपता? मग वेळीच व्हा सावध, उद्भवू शकतात आरोग्यसंबंधित ‘या’ गंभीर समस्या

काही महिलांना रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपण्याची सवय असते. पण रात्रीच्या वेळी ब्रा घातल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. दिवसभर घट्ट ब्रा घातल्यानंतर रात्री झोपताना ब्रा काढून झोपणे आवश्यक आहे. कारण रात्री झोपताना शरीराच्या सर्व अवयवांना हवा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यास आरोग्यासंबंधित कोणत्या समस्या उद्भवतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 09, 2024 | 03:45 PM
रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम

रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम

Follow Us
Follow Us:

रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी सगळ्यांचं आरामदायी आणि शरीराला न टोचणारे कपडे घालायला आवडतात. कारण रात्रीच्या वेळीस चांगली झोप येण्यासाठी आरामदायी कपडे घालण्यास प्राधान्य दिले जाते. रात्रीच्या वेळी झोपताना अनेक महिला ब्रा घालून झोपतात. पण रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपणे योग्य आहे की नाही? असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. काहीवेळा महिला हा प्रश्न डॉक्टरांना विचारण्यासाठी सुद्धा संकोचतात. पण अनेक संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपू नये. तसेच एका संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी झोपताना अंगावर एकही कपडा नसावा कारण रात्री झोपल्यानंतर शरीराच्या सर्व अवयवांना हवा मिळणे गरजेचे आहे. पण तुम्ही जर हे करू शकत नसाल तर रात्री कॉटनचे आणि हलके फुलके कपडे अंगावर घालावे. आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्या समस्या उद्भवतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम:

रक्तभिसरणावर वाईट परिणाम होणे:

रकाही महिलांना ब्रा घातल्याशिवाय झोप लागत नाही. पण ब्रा घातल्यामुळे रक्तभिसरण होण्यास अडथळे निर्माण होतात. निद्रानाश यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तसेच स्तनांमध्ये रक्त नीट पोहोचू शकत नाही.त्यामुळे महिलांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. घट्ट आणि वायर्ड ब्रा घातल्यामुळे शरीरावर चट्टे किंवा डाग उठण्याची शक्यता असते. घट्ट ब्रा घातल्यामुळे पाठीमध्ये दुखण्यास सुरुवात होते.

हे देखील वाचा:सुडौल बांध्यासाठी वापरताय घट्ट ब्रा? होऊ शकतात आरोग्यावर गंभीर परिणाम 

मज्जासंस्थेवर परिणाम:

रात्री ब्रा घालून झोपल्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. ब्रा घातल्यामुळे महिलांचे शरीर निरोगी राहते आणि शरीराला व्यवस्थित आकार येतो. पण घट्ट ब्रा घातल्यामुळे स्तनांभोवतीची त्वचा आकुंचन पावते, ज्याचा परिणाम मज्जासंस्थेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी ब्रा काढून झोपल्यास स्तनांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम

काळे डाग पडणे:

रात्री झोपताना किंवा इतर वेळी जास्त घट्ट ब्रा घातल्यामुळे पाठीवर काळे डाग पडू लागतात. तसेच त्वचेवर पुरळ, मुरूम किंवा इतर त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात.त्यामुळे रात्रीच्या वेळी ब्रा काढून झोपणे गरजेचे आहे. दिवसभर घट्ट ब्रा घालून राहिल्यानंतर रात्रीच्या वेळी ब्रा काढून झोपल्यामुळे झोप चांगली लागते.

हे देखील वाचा: केवळ 1 मिनिटात कळणार आता ब्रेस्ट कॅन्सरची पहिली स्टेज, Smart Bra चा लागला शोध

झोपेचा त्रास होण्याची शक्यता:

दिवसभर घट्ट ब्रा घालून झोपल्यानंतर रात्रीच्या वेळी ब्रा काढून झोपाव. अन्यथा झोपेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. रात्री ब्रा घातल्यामुळे रात्रीच्या वेळी अस्वथ वाटू लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी व्यवस्थित झोप लागत नाही. तसेच रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्यामुळे स्तनांमध्ये गाठी होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी रात्रीच्या वेळी ब्रा घालणे टाळले पाहिजे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Side effects of wearing bra while sleeping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
2

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर
3

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
4

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.