स्तनाच्या कर्करोगासाठी स्मार्ट ब्रा
स्तनाचा कर्करोग ही महिलांसाठी मोठी समस्या बनत चालली आहे. मात्र आता या समस्येवर तोडगा निघताना दिसत आहे. IIT कानपूरच्या एका संशोधकाने एक स्मार्ट ब्रा विकसित केली आहे, जी स्तनाचा कर्करोग शोधण्यात खूप उपयुक्त ठरू शकते.
हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, संशोधक श्रेया नायर यांनी बायोसायन्स आणि बायोइंजिनियरिंग विभागाचे प्रमुख प्रा. अमिताभ बंदोपाध्याय यांच्या देखरेखीखाली ही स्मार्ट ब्रा तयार केली आहे. ब्रेस्ट कॅन्सरचा प्रसार झपाट्याने होत असून या आजाराचे वेळीच निदान न होणे हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे श्रेयाचे मत आहे. त्यामुळे तिने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय. (फोटो सौजन्य – iStock)
स्मार्ट ब्रा कसे काम करणार
स्मार्ट ब्रा चा उपयोग करून कळणार स्तनाचा कर्करोग
ही स्मार्ट ब्रा खूपच आश्चर्यकारकपणे कार्य करते. या ब्रामध्ये एक खास प्रकारचा सेन्सर आहे, जो स्तनामध्ये कोणताही बदल लगेच ओळखतो. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे लवकर दिसल्यास, हा सेन्सर ताबडतोब अलर्ट पाठवतो. अशाप्रकारे, स्त्रिया हा रोग अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच जाणून घेऊ शकतात आणि त्यावर उपचार करू शकतात. श्रेयाच्या म्हणण्यानुसार, या स्मार्ट ब्रा चा प्रोटोटाइप तयार आहे आणि क्लिनिकल चाचण्या केल्या जात आहेत.
हेदेखील वाचा – भारतात 30 पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग, लक्षणे कशी दिसतात?
1 मिनिटात कळेल
ही ब्रा दिवसातून फक्त एक मिनिट घालायची असते. ही ब्रा मोबाईलशी कनेक्टड असून संपूर्ण डेटा तयार करते. सेन्सरला स्तनांमध्ये काही बदल आढळल्यास, तो मोबाईलवर संदेश पाठवतो आणि महिलेला डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला देतो अशी सिस्टिम यामध्ये तयार करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा – Breast Cancer होऊ शकतो पूर्ण बरा, या पद्धतीने करा स्वतःची तपासणी
एक वर्षानंतर बाजारात उपलब्ध
श्रेयाने सांगितले की, या स्मार्ट ब्रा ची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे आणि जर सर्व काही सुरळीत झाले तर वर्षभरात ती बाजारात उपलब्ध होईल. या ब्रा ची किंमत सुमारे 5 हजार रुपये असेल, असे कोणतेही उपकरण अद्याप बाजारात उपलब्ध नसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे बाजारात आल्यानंतर याचा कशा पद्धतीने महिला उपयोग करून घेतील पाहावे. लागेल. सध्या यावर प्रक्रिया चालू असून चाचपणी केली जात आहे.