घट्ट ब्रा घातल्याने आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
सर्वच महिला आणि मुलींना दैनंदिन जीवनात आकर्षक आणि चांगली फिगर हवे असते. चांगली फिगर मिळवण्यासाठी अनेक महिला वेगवगेळे उपाय करतात. महिलांना असा पोषक हवा असतो ज्यात त्यांना आरामदायी आणि चांगले वाटेल. प्रत्येक स्त्रीसाठी ब्रा घालणे अत्यंत गरजेचे आहे. ब्रा घातल्यामुळे तुमचा लुक सुधारत नाही तर स्तनांना आधार देण्यास ब्रा मदत करतात. पण अनेक स्त्रियांचा असा विश्वास आहे की घट्ट ब्रा घातल्यानंतर आपला लुक अधिक चांगला आणि स्टयलिश दिसतो. पण हे चुकीचे आहे.
घट्ट ब्रा घातल्याने आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. ब्रा घालण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्तनांना आधार देणे आणि आकार देणे. पण अनेक महिला याची फॅशनसोबत तुलना करतात. हे सर्व आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या अभ्यासामध्ये सांगण्यात आले आहे की रोजच्या वापरता घट्ट ब्रा घातल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला घट्ट ब्रा घातल्याने आरोग्यावर नेमके काय गंभीर परिणाम दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: प्रवासाला गेल्यानंतर ‘अशा’ पद्धतीने घ्या त्वचेची काळजी, चेहऱ्यावर दिसेल चमक
रोजच्या वापरात घट्ट ब्रा घातल्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे घट्ट ब्रा घालून नये. घट्ट ब्रा घातल्याने छातीवर दबाव पडून फुफ्फुसांवर त्यांचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे घट्ट ब्रा घालू नये.
घट्ट ब्रा घाल्यामुळे पाठ आणि मान दुखण्यास सुरुवात होते. घट्ट ब्रा घातल्यामुळे ब्राचे पट्टे खांद्यामध्ये रुतत जातात. यामुळे शरीरावरील त्वचेला जखम होऊ शकते. घट्ट ब्रा घातल्यामुळे डोके दुखीची समस्या सुद्धा उद्भवू शकते. अंडरवायर असलेली ब्रा त्वचेमध्ये रुतत गेल्यानंतर स्तन दुखू शकतात.
घट्ट ब्रा घातल्याने आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
घट्ट ब्रा घातल्यामुळे त्वचा लाल होणे किंवा रॅशेस उठणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. यामुळे फॉलिक्युलायटिस, त्वचारोग, उष्मा पुरळ आणि पित्ताच्या गाठी उठण्याची शक्यता असते. तसेच बॅक्टेरिया आणि बुरशी सहजपणे त्वचेच्या छिद्रांमध्ये प्रवेश करतात, यामुळे त्वचेचा संसर्ग होऊ शकतो.
हे देखील वाचा: रक्तदाबासह गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी आहारात करा’या’ मिठाचा समावेश
दैनंदिन वापरामध्ये घट्ट ब्रा घालू नये, यामुळे रक्तभिसरण होण्यात अडथळा निर्माण होतो. घट्ट ब्रा घातल्यामुळे छातीवर दाब पडतो. ज्यामुळे रक्ताच्या योग्य प्रवाहात अडथळा येऊन रक्त परिसंचरण खराब होण्याची शक्यता असते. तसेच घट्ट ब्रा घातल्यामुळे खांद्यावर दाब पडून शरीराची रचना बदलून जाते.