
१० मिनिटांमध्ये त्वचा होईल स्वच्छ आणि उजळदार! चेहऱ्यावरील केस आणि टॅनिंग घालवण्यासाठी 'या' पद्धतीने करा साखरेचा वापर
महिलांसह सर्वच पुरुषांना आपली त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार हवी असते. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करतात. कधी फेशिअल, क्लीनअप केले जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअरचा वापर त्वचेसाठी केला जातो. पण बऱ्याचदा चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी वारंवार पार्लरमध्ये जावे लागते. फेशिअल हेअर वाढल्यानंतर त्वचा निस्तेज आणि टॅन झाल्यासारखी वाटते. अशावेळी पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग केले जाते. थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग केल्यामुळे संवेदनशील त्वचेवर रॅश किंवा लालसरपणा वाढू लागतो. याशिवाय काहीवेळा चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी आणि टॅनिंग घालवण्यासाठी केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केला जातो.(फोटो सौजन्य – istock)
Skin Care Tips: टॅन अन् डल स्कीनला करा बाय, घरीच तयार करा ‘हा’ फेस पॅक; त्वचा होईल चमकदार
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि नको असलेले केस काढण्यासाठी कायमच पार्लरला जाण्याची आवश्यकता नसते. हे केस तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करून सुद्धा काढू शकता. घरगुती पदार्थांचा वापर केल्यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही आणि त्वचा कायमच उजळदार राहते. वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेचे गंभीर नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला साखरेचा वापर करून चेहऱ्यावरील नको असलेले केस कशा पद्धतीने काढावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे तुमच्या त्वचेचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि चेहरा कायमच सुंदर राहील.
लिंबाच्या रसाचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावर असलेले काळे डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते. पार्लरमध्ये जाऊन कायमच वॅक्सिंग करण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये फेस वॅक्स करावे.यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही आणि चेहरा कायमच सुंदर राहतो. कॉफीमध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग कमी होतो. वारंवार केलेल्या केमिकल ट्रीटमेंट किंवा लेझर ट्रीटमेंट उतार वयात त्वचेचे नुकसान करतात. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक उपाय करावेत.