Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sleep Duration: निरोगी शरीरासाठी वयानुसार किती तासांची झोप आवश्यक? जाणून घ्या तुमचा ‘परफेक्ट स्लीप टाइम’

Required Sleep as per Age: वयोमानानुसार शरीराला किती तासांच्या झोपेची आवश्यकता आहे, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 21, 2026 | 07:20 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Close
Follow Us:
  • वयानुसार किती तास झोप आवश्यक?
  • जाणून घ्या परफेक्ट स्लीप टाइम
  • उशिरापर्यंत मोबाईलचा वापर टाळा
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांच्या झोपेची वेळ बदलली आहे. मात्र, निरोगी शरीर आणि चांगल्या मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप अत्यंत गरजेची असते. प्रत्येक वयोगटानुसार झोपेची गरज बदलत जाते. शरीराची वाढ, मेंदूचा विकास आणि दैनंदिन कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात झोप मिळणे महत्त्वाचे मानले जाते. नियमित आणि शांत झोप ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे झोपेची वेळ निश्चित ठेवणे, रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर टाळणे आणि हेल्दी लाइफस्टाइल अंगीकारणे आवश्यक आहे. वयानुसार किती तास झोप आवश्यक आहे, जाणून घ्या.

Health Tips: किडनी स्टोनचा धोका होईल कमी, रोज प्या ‘हे’ हेल्दी ज्यूस, समस्येपासून मिळेल आराम

नवजात बाळ

तज्ज्ञांच्या मते, नवजात बाळांना (New Born) सर्वाधिक झोप आवश्यक असते. जन्मानंतरच्या काही महिन्यांत बाळ दिवसातील बहुतांश वेळ झोपेत घालवते. या काळात त्यांचा मेंदू वेगाने विकसित होत असतो. त्यामुळे नवजात बालकांसाठी साधारण १४ ते १७ तास झोपेची आवश्यक मानली जाते.

शाळेत जाणारी मुलं (६-१३ वर्षे)

शाळेत जाणाऱ्या मुलांनी दररोज किमान ९ ते ११ तास झोप घेणे गरजेचे आहे. पुरेशी झोप घेतल्यास मुलांची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते आणि अभ्यासात चांगली कामगिरी करता येते. झोप अपुरी राहिल्यास चिडचिड, थकवा आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

टिनेजर (१४-१७ वर्षे)

टिनेजर (Teenagers) म्हणजेच किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल झपाट्याने होत असतात. त्यामुळे या वयोगटासाठी ८ ते १० तास झोप उपयुक्त मानली जाते. मात्र, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अनेक तरुणांची झोप कमी होत असल्याचे दिसून येते.

प्रौढ व्यक्ती (१८-६४ वर्षे)

प्रौढ व्यक्तींनी (Adult) साधारण ७ ते ९ तास झोप घेणे आवश्यक आहे. झोप पूर्ण झाल्यास कामात लक्ष केंद्रित होते, एकाग्रता वाढते आणि मानसिक ताण कमी होतो. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी राहतो. तसेच, मानसिक आरोग्य सुधारते. सतत झोपेच्या अभावामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि थकवा यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षे आणि जास्त)

जसजसे वय वाढते, तसतशी आपल्या शरीराची कार्यक्षमता हळूहळू कमी होते, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ७ ते ८ तासांची झोप पुरेशी मानली जाते. चांगल्या झोपेमुळे स्मरणशक्ती सुधारते, ऊर्जा मिळते आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. परंतु, वाढत्या वयानुसार झोप कमी होऊ शकते आणि रात्री वारंवार जाग येऊ शकते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Health Tips: उन्हाळ्यात जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीये का? जाणून घ्या

Web Title: Sleep duration by age health benefits and healthy sleep tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Best Sleep
  • daily health tips
  • Healthy life
  • lifestyle tips
  • Sleeping at Night

संबंधित बातम्या

Weight Loss Tips: जिमशिवायही होईल वजन कमी! दररोजच्या ‘या’ हेल्दी सवयी ठरतील गेमचेंजर
1

Weight Loss Tips: जिमशिवायही होईल वजन कमी! दररोजच्या ‘या’ हेल्दी सवयी ठरतील गेमचेंजर

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे
2

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे

Health Tips: डायबिटीजचे रुग्ण आहात? नाश्त्यामध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ
3

Health Tips: डायबिटीजचे रुग्ण आहात? नाश्त्यामध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत
4

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.