
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅबलेट यांसारखी गॅजेट्स आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत मोबाईलच्या संपर्कात असतो. परंतु, या गॅजेट्समधून सतत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघत असते, जी आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे डोकेदुखी, थकवा, डोळ्यांचे विकार आणि निद्रानाशाचा त्रास उद्भवू शकतो. या अदृश्य रेडिएशनचा धोका कमी करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय आपण नक्कीच अवलंबू शकतो.
हर्बल आणि ऑक्सिजन देणारी रोपांचा वापर
घरात किंवा ऑफिसच्या डेस्कवर स्पायडर प्लांट, एलोवेरा आणि स्नेक प्लांट यांसारखी इनडोअर रोपे ठेवावीत. ही रोपे केवळ घरातील हवा शुद्ध करत नाहीत, तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणारे हानिकारक रेडिएशन आणि विषारी वायू शोषून घेण्यास मदत करतात. वैज्ञानिकदृष्ट्याही ही रोपे रेडिएशनचा प्रभाव कमी करण्यासाठी फायदेशीर मानली जातात.
सासरच्या लोकांमुळे नवरा-बायकोच्या नात्यामध्ये सतत वाद होतात? मग फॉलो करा ‘या’ टिप्स, भांडण होतील कमी
काकडी आणि बटाट्याचा वापर (त्वचेच्या सुरक्षेसाठी)
जेव्हा आपण तासन्तास मोबाईल किंवा कॉम्प्युटरसमोर बसतो, तेव्हा स्क्रीनमधून निघणाऱ्या रेडिएशनचा आणि निळ्या प्रकाशाचा सर्वाधिक परिणाम आपल्या डोळ्यांवर आणि त्वचेवर होतो. यासाठी, डोळ्यांवर काकडीचे काप किंवा किसलेला बटाटा काही वेळ ठेवून विश्रांती द्यावी. यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते, थकवा दूर होतो आणि त्वचेला थंडावा मिळून रेडिएशनमुळे होणारे नुकसान टाळता येते.
हळद आणि तुळशीचे सेवन
निसर्गाने आपल्याला अनेक रोगप्रतिकारक औषधी वनस्पती दिल्या आहेत. आहारात हळद, आले आणि तुळशीचा नियमित वापर केल्याने शरीराची अंतर्गत ताकद वाढते. हळदीमध्ये असणारे ‘कुरकुमिन’ घटक शरीराच्या पेशींना रेडिएशनमुळे होणाऱ्या डॅमेजपासून वाचवण्यास मदत करतो. तसेच रोज सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.
मीठाचा वापर
घराच्या किंवा बेडरूमच्या कोपऱ्यात एका काचेच्या बाऊलमध्ये खडे मीठ किंवा समुद्री मीठ भरून ठेवावे. हे मीठ परिसरातील रेडिएशन शोषून घेते असे मानले जाते. दर काही दिवसांनी हे मीठ बदलावे.
काही सवयी बदलणे गरजेचे
घरगुती उपायांसोबतच काही साधी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. झोपताना मोबाईल उशाशी किंवा शरीराच्या जवळ ठेवू नका. कॉलवर बोलताना शक्यतो स्पिकरचा किंवा वायर्ड इयरफोनचा वापर करा आणि नेटवर्क कमजोर असताना फोनचा वापर टाळा, कारण त्यावेळी फोन सर्वाधिक रेडिएशन सोडतो. या छोट्या उपायांनी आपण गॅजेट्सच्या धोक्यापासून स्वतःचे रक्षण करू शकतो.