Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोळा सोमवारचे उद्यापन कसे करावे? पूजेपासून दान-दक्षिणेपर्यंत सर्वकाही जाणून घ्या

सोळा सोमवारच्या उद्यापनात गव्हाच्या पिठाचा, गूळ आणि तुपाचा मलिदा बनवून प्रसादाचे तीन भाग केले जातात. या उद्यापनाचा प्रसाद ज्या स्त्रीला पहिले अपत्य पुत्र आहे तिने जरूर ग्रहण करावा अशी परंपरेने चालत आलेली लोकश्रद्धा असून, त्यामागचे मूळ धार्मिक रहस्य काय आहे?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 27, 2026 | 07:30 AM
सोळा सोमवारचे उद्यापन कसे करावे? पूजेपासून दान-दक्षिणेपर्यंत सर्वकाही जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • पौराणिक कथेनुसार सोळा सोमवारचे व्रत हे सुसंस्कृत संतती आणि पुत्रप्राप्तीसाठी अत्यंत फलदायी मानले जाते.
  • पहिले अपत्य पुत्र असणाऱ्या स्त्रीने प्रसाद स्वीकारल्याने व्रतातील संतती संतासत्त्वाचे आणि शुभ शकुनाचे प्रतीक मानले जाते.
  • परंपरेनुसार अशा पुत्रवती स्त्रीला प्राधान्याने प्रसाद देऊन तिच्याकडून समृद्धी आणि वंशवृद्धीचे आशीर्वाद घेतले जातात.

हिंदू धर्मात शिव महादेवाचे सोळा सोमवारचे व्रत हे अतिशय फलदायी आणि पवित्र मानले जाते. सलग सोळा सोमवार सुकामेवा, फराळ, निव्वळ खडी साखर किंवा चूरम्याचा प्रसाद घेऊन उपवास केल्यानंतर १७ व्या सोमवारी किंवा इतर शुभ मुहूर्ती या व्रताची विधिवत सांगता केली जाते, त्यालाच ‘उद्यापन’ असे म्हणतात. उद्यापनाशिवाय व्रताची पूर्णता होत नाही. काही ग्रामीण ठिकाणी याला सोमवार ‘उजवणे’ असेही म्हणाले जाते.

उद्यापनाची पूर्वतयारी व आवश्यक साहित्य

उद्यापनाच्या आदल्या दिवशी घरातील पूजास्थान स्वच्छ करून घ्यावे. जर एखाद्या तीर्थस्थळी करण्याचे नियोजन असेल तर त्याप्रमाणे.

  • पूजेचे साहित्य: तांब्याचा तांब्या, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), पांढरे चंदन, अबीर, गुलाल, अक्षता, हळद-कुंकू, धूप, दीप, कापूर, देठाची विड्याची पाने, सुपाऱ्या, फळे, १०८ किंवा १००८ बेलाची पाने आणि पांढरी फुले.
  • चुरम्याचा प्रसाद: ५ किलो (किंवा इच्छेनुसार/यथाशक्ती) गव्हाच्या पिठाचा, गूळ आणि शुद्ध तूप वापरून तयार केलेला चूरमा (मलिदा). (टीप: प्रसादात मीठ घालू नये). इतर प्रसाद सुद्धा चालू शकतो. गुरुजींच्या मार्गदर्शनाप्रमाणे योग्य तो प्रसाद करावा.
  • हवन व मंडप साहित्य: शेण, तांदळाचे पीठ ,रांगोळी/लिंपण, आंबा/बेल/पळसाच्या समिधा, हवन सामग्री, गाईचे तूप, नवग्रह आणि उमा-महेश्वर स्थापनेसाठी तांदूळ/गहू.
शास्त्रोक्त वैदिक विधी टप्प्याटप्प्याने

उद्यापनाचा विधी सहसा गुरुजींच्या (ब्राह्मणांच्या) मार्गदर्शनाखाली वेदोक्त किंवा शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण केला जातो.

१. लिंपण व मांडणी (स्थान शुद्धी)

पूजास्थान शेणाने किंवा स्वच्छ पाण्याने पुसून त्यावर तांदळाच्या पिठाची किंवा रांगोळीची आकर्षक रांगोळी काढली जाते (ज्याला पारंपारिक भाषेत लिंपण किंवा चौक मांडणे म्हणतात). त्यावर चौरंग किंवा पाटाची स्थापना केली जाते.

Kuldevta: कुलदैवताला चांदीचा टाक जेजुरीवरूनच का आणतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि परंपरा

२. पुण्याहवाचन आणि गणेश-मातृका पूजन

पूजा यशस्वीरीत्या पार पडावी यासाठी प्रथम विघ्नहर्त्या श्री गणेशाची पूजा केली जाते. त्यानंतर पुण्याहवाचन (पवित्र जल शिंपडून वास्तू व पूजासाहित्याची शुद्धी) करून षोडश मातृकांचे पूजन केले जाते.

३. उमा-महेश्वर स्थापना

चौरंगावर तांदळाची राशी ठेवून त्यावर कलश स्थापन केला जातो. या कलशावर ‘उमा-महेश्वर’ (शिव-पार्वती) यांच्या धातूच्या किंवा मातीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. आवाहनानंतर श्री उमा-महेश्वरांना पंचामृत अभिषेक, जलाभिषेक, पांढरे वस्त्र, अष्टगंध, अक्षता, पांढरी फुले आणि १०८ किंवा १००८ बेलपत्रे ‘ॐ नमः शिवाय’ किंवा ‘रुद्रसूक्ताच्या’ मंत्रोच्चारात अर्पण केली जातात.

बर्याचदा सोळा सोमवारच्या उद्यापनात १६ तांब्याचे कलश ठेवले जातात. हे आपण पूर्ण केलेल्या सलग १६ सोमवारांच्या व्रतांचे, चंद्राच्या १६ कलांचे आणि महादेवाच्या १६ रुद्रांशांचे प्रतीक मानले जाते; या कलशांमध्ये पवित्र तीर्थ आणि वरुण देवाचे आवाहन करून १६ ब्राह्मणांच्या नावाने संकल्प सोडला जातो, ज्यामुळे पूजेत प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन उमा-महेश्वराची पूर्ण कृपा प्राप्त होते.

४. हवन (होम-हवन विधी)

पवित्र कुंडात, पाटावर किंवा यज्ञस्थळी अग्नीची स्थापना केली जाते. महादेवाच्या ‘शिव पंचाक्षर मंत्र’ (ॐ नमः शिवाय), मृत्युंजय मंत्र आणि नवग्रहांच्या नावाने आहुती दिल्या जातात. गव्हाचा चूरमा, तीळ, तूप आणि हवन सामग्रीने मुख्य होम पूर्ण करून शेवटी पूर्णाहुती दिली जाते.

५. कथा वाचन व आरती

पूजा व हवन झाल्यानंतर सोळा सोमवार व्रताची पोथी-कहाणी भक्तिभावाने वाचली जाते. कहाणी पूर्ण झाल्यावर धूप-दीप दाखवून श्री शंकराची व आरती केली जाते आणि कापूर आरती करून देवाला क्षमायाचना केली जाते. उमा-माहेश्वाराला फुले बेल वाहिले जातात.

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व

सोळा ब्राह्मण जोडपे अन्नदान, साडी-ओटी व दान-दक्षिणा

सोळा सोमवार उद्यापनामध्ये दानाला अत्यंत विशेष महत्त्व आहे,

  • सोळा ब्राह्मण जोडपे (दंपती) पूजन: उद्यापनाच्या दिवशी १६ ब्राह्मण आणि त्यांच्या पत्नींना (सोळा जोडप्यांना) आदराने निमंत्रित केले जाते. (यथाशक्ती १६ जोडपे शक्य नसल्यास १ किंवा ५ जोडप्यांनाही निमंत्रित करू शकता).
  • अन्नदान: सर्व जोडप्यांचे पाय धुवून त्यांचे पूजन केले जाते. त्यांना महादेवाचा प्रिय चूरमा प्रसाद आणि पंचपक्वान्नाचे सात्त्विक भोजन (सहसा विना मीठ किंवा सात्त्विक भोजनाचा नियम सांभाळून) वाढले जाते.
  • साडी-ओटी व वस्त्रदान: आमंत्रित सुवासिनींना साडी-चोळी अर्पण करून तांदूळ, खण, नारळ, हळद-कुंकू आणि फळांनी त्यांची ओटी भरली जाते. काही ठिकाणी गजरा ही ओटी मध्ये दिला जातो. ब्राह्मणांना धोतर, उपरणे किंवा वस्त्रे भेट दिली जातात.
  • दान-दक्षिणा: भोजन व वस्त्रदानानंतर सर्व ब्राह्मणांना आणि सुवासिनींना दान-दक्षिणा, विड्याची पाने-सुपारी आणि धातूचे भांडे तांब्या किंवा ताट जसे शक्य होईल तसे दान देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.
प्रसादाचे वाटप आणि नियम

१. उद्यापनाच्या दिवशी बनवलेल्या चूरम्याचे मुख्यत्वे तीन भाग केले जातात, ( बरेच जन निव्वळ खडीसाखरे वर निरंक उपास करतात. त्यांनी खडीसाखर म्हणून हा प्रसाद घेतला तरी चालतो.)

  • पहिला भाग: देवाच्या नैवेद्यासाठी व मंदिरात अर्पण करण्यासाठी.
  • दूसरा भाग: उपस्थित ब्राह्मण, सुवासिनी आणि गोमातेला खायला देण्यासाठी.
  • तिसरा भाग: व्रताचे उद्यापन करणाऱ्या व्यक्तीने आपल्या कुटुंबातील सदस्यांसह प्रसाद म्हणून ग्रहण करण्यासाठी. २. या दिवशी मिठाचे सेवन टाळावे किंवा व्रताच्या नियमानुसार उपवास सोडून प्रसादाचे ग्रहण करावे.
धार्मिक आणि लोकपरंपरेत “ज्यांना पहिले अपत्य पुत्र आहे त्यांनी हा प्रसाद जरूर ग्रहण करावा” किंवा “प्रसाद देताना पुत्रवती स्त्रियांना प्राधान्य द्यावे” असा संकेत मानण्यामागे काही विशिष्ट धार्मिक आणि सामाजिक कारणे आहेत. असे म्हणतात, ज्यांचे पहिले अपत्य पुत्र आहे, त्यांनी विशेष सोळा सोमवारचे व्रत करावे किंवा सोळा सोमवारचा प्रसाद घ्यावा. पौराणिक कथेनुसार, सोळा सोमवारचे व्रत हे प्रामुख्याने उत्तम वर मिळण्यासाठी, अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी आणि गुणवान, सुसंस्कृत संतती मिळवण्यासाठी केले जाते. त्यामुळे ज्या स्त्रियांना पहिले अपत्य पुत्र झाले आहे, त्यांना या व्रताच्या फळाचे आणि संतासत्त्वाचे मूर्तिमंत रूप मानले जाते.यामुळे सुख शांती सम्मृद्धी भरभरून येते.  शिवाय, उद्यापनाच्या पूजेच्या वेळेस उद्यापन करणाऱ्या जोडप्यास घरचा आहेर करणे विधिवत गरजेचे मानले जाते.

अशा रीतीने विधीवत, भावपूर्ण आणि शास्त्रोक्त पद्धतीने सोळा सोमवारचे उद्यापन केल्याने भगवान श्री उमा-महेश्वराची कृपा प्राप्त होते, घरातील सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

( नोट: नवराष्ट्र या विधी, पूजा आणि परंपरांची पूर्णपणे पुष्टी करू शकत नाही. तज्ञांचे मार्गदर्शन घेणे यासाठी अपरिहार्य ठरेल.)

Web Title: Sola somvar udhyapan prasad putravati stree rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 07:30 AM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Religion

संबंधित बातम्या

दूध गरम करताना ‘या’ चुका करणे टाळा! दूध फाटण्यासोबतच चवीमध्ये सुद्धा होईल बदल
1

दूध गरम करताना ‘या’ चुका करणे टाळा! दूध फाटण्यासोबतच चवीमध्ये सुद्धा होईल बदल

मुलांच्या खोटं बोलण्याची सवय कशी थांबवावी? पालकांसाठी जाणून घ्या ‘या’ खास टिप्स, मुलांच्या सवयींमध्ये होतील बदल
2

मुलांच्या खोटं बोलण्याची सवय कशी थांबवावी? पालकांसाठी जाणून घ्या ‘या’ खास टिप्स, मुलांच्या सवयींमध्ये होतील बदल

पाळीव प्राण्याचे अन्नपदार्थ बदलताना ‘या’ सोप्या आणि सुरक्षित पद्धतींचा करा अवलंब, प्राण्यांचे आरोग्य राहील निरोगी
3

पाळीव प्राण्याचे अन्नपदार्थ बदलताना ‘या’ सोप्या आणि सुरक्षित पद्धतींचा करा अवलंब, प्राण्यांचे आरोग्य राहील निरोगी

Brahmanda Purana: ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून देवी ललितेच्या भंडासुर वधापर्यंत; जाणून घ्या पुराणातील प्रमुख कथा
4

Brahmanda Purana: ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून देवी ललितेच्या भंडासुर वधापर्यंत; जाणून घ्या पुराणातील प्रमुख कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.