
पाळीव प्राण्याचे अन्नपदार्थ बदलताना ‘या’ सोप्या आणि सुरक्षित पद्धतींचा करा अवलंब, प्राण्यांचे आरोग्य राहील निरोगी
अनेक प्राणिप्रेमींना पाळीव प्राण्यांचे अन्न बदलणे ही साधी आणि सोपी गोष्ट वाटते. प्रत्यक्षात पाळीव प्राण्यांचे अन्न सहजासहजी बदलता येत नाही. कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या मते, प्राण्यांच्या पचनसंस्थेत त्यांच्या नियमित आहाराशी सुसंगत असलेले विशिष्ट जीवाणू कार्यरत असतात. आहारात अचानक बदल झाल्यास या जीवाणूंचा समतोल बिघडतो. यामुळे प्राण्यांना उलट्या किंवा जुलाब होतात. कित्येकदा प्राणी अन्नत्याग करतात. ही समस्या गंभीर स्वरुप धारण करू शकते.याविषयी डॉ. अशोक पटनाईक, प्रमुख, संशोधन आणि विकास, गोदरेज पेट केअर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी
प्राण्यांच्या दोन वेगवेगळ्या पॅकेजबंद फूड ब्रँड्समध्ये बदल करता येतात. या दोन्ही ब्रँड्समधील अन्नाचे स्वरूप समान असते. मात्र प्राण्यांना घरगुती अन्न मिळत असल्यास त्यांना पॅकेजबंद अन्नपदार्थांकडे वळवणे आव्हानात्मक ठरते. घरगुती अन्न मऊ आणि ओलसर असते. याउलट, पॅकेजबंद सुकलेल्या अन्नपदार्थांमध्ये घरगुती अन्नपदार्थांच्या तुलनेत १० टक्के कमी ओलावा असतो. त्यामुळे मऊ अन्नपदार्थांची सवय असलेल्या पाळीव प्राण्यांना सुके अन्नपदार्थ खाताना अडचणी निर्माण होतात. ते पॅकेजबंद अन्नपदार्थ चावून खाण्याऐवजी थेट गिळण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय, घरगुती आणि पॅकेज्ड अन्नातील पोषक असिडिटी आणि उलट्यांचा त्रास उद्भवू शकतो. याशिवाय, घरगुती आणि पॅकेज्ड अन्नातील पोषक घटकांमध्ये भिन्नता आढळल्याने प्राण्यांच्या पचनसंस्थेला या बदलांशी जुळवून घेण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. नवीन अन्न जुन्या आहारात थोडे मिसळून द्यावे. कालांतराने हे प्रमाण वाढवावे. या पद्धतीचा अवलंब केल्यास संभाव्य धोके पूर्णपणे टाळता येतात.
पशुतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार, पाळीव प्राण्यांच्या आहारात बदल करण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी सर्वात सुरक्षित मानला जातो. या प्रक्रियेत जुन्या आहारात १० ते २५ टक्के नवीन पॅकेजबंद अन्न मिसळावे. त्यानंतर दर दोन ते तीन तासांनी नवीन अन्नाचे प्रमाण वाढवणे सोयीस्कर ठरते. या कालावधीच्या अखेरीस प्राण्याला पूर्णपणे नवीन आहार देणे शक्य होते. कुत्र्यांच्या तुलनेत मांजरींना नवीन आहाराशी मानसिक व शारीरिकदृष्ट्या जुळवून घेण्यासाठी गरजेपुरता वेळ मिळतो. त्यामुळे मांजरींच्या बाबतीत संयम बाळगून सावकाशपणे आहारात बदल करणे फायदेशीर ठरेल.
पाळीव प्राण्यांचे अन्नपदार्थ विकणारे ब्रँड्स आणि त्यातील ओले किंवा सुके अन्न या दोघांनाही समान महत्त्व असते. सुक्या अन्नाकडून ओल्या अन्नाकडे जाताना आहाराच्या प्रमाणात वाढ करायला हवी. ओल्या अन्नपदार्थांमध्ये ८० टक्के पाण्याचे प्रमाण असते. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने प्राण्यांना कॅलरीज मिळवण्यासाठी जास्त अन्नाचा पुरवठा करावा लागतो. याउलट, ओल्या अन्नाकडून सुक्या अन्नपदार्थांकडे वळताना कमी प्रमाणातील अन्नही पुरेसे ठरते. सुक्या अन्नपदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात कॅलरी असल्याने प्राण्यांना जास्त अन्न देण्याची गरज भासत नाही. अनेकदा पाळीव प्राणी नवीन अन्नपदार्थ सहजा स्विकारत नाहीत. अशावेळी सुक्या अन्नात कोमट पाणी किंवा सूप मिसळल्यास प्राण्यांच्या आहारातील बदल करण्याची प्रक्रिया सुलभतेने घडते.
उत्पादनाच्या मार्केटिंग दाव्यांवर विश्वास न ठेवता, उत्पादनातील घटकपदार्थांकडे लक्ष द्यावे. या घटकांमध्ये प्राणिजन्य प्रथिनांचे प्रमाण तपासून घ्यावे. मांस किंवा प्राणिजन्य उत्पादने अशा संदिग्ध उल्लेखांऐवजी कोंबडीचे मांस किंवा मासे यांसारख्या विशिष्ट प्रथिनांचा समावेश असलेले अन्न हे पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासाठी तसेच पोषणासाठी चांगले मानले जाते.
Raksha Bandhan Gift Ideas: राखीला यंदा चॉकलेट्स नको! भावाला आवडतील असे ‘हे’ ५ हटके गिफ्ट आयडिया
प्राण्यांच्या आहारबदल प्रक्रियेत घाई नसावी. ही प्रक्रिया संयमाने अंमलात आणावी. तुम्ही प्राण्यांच्या अन्नपदार्थ बदलांत घाई केल्यास त्यांच्या मनात संबंधित अन्नपदार्थाविषयी कायमस्वरूपी नावड निर्माण होईल. म्हणूनच, अन्नातील घटकांचे योग्य निरीक्षण केल्यानंतर ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवावी. ही प्रक्रिया परिणामकारक ठरते. यामुळे पाळीव प्राण्याचे आरोग्य सुरक्षित राहून अन्नावरील त्यांचा विश्वासही कायम राखला जातो.
Ans: नाही. अचानक आहार बदलल्यास काही प्राण्यांना उलट्या, जुलाब, गॅस किंवा भूक कमी होण्यासारख्या पचनाच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे नवीन अन्न हळूहळू सुरू करणे योग्य ठरते.
Ans: सुरुवातीला जुन्या अन्नात थोडे नवीन अन्न मिसळा आणि पुढील काही दिवसांत नवीन अन्नाचे प्रमाण हळूहळू वाढवा. साधारण ७–१० दिवसांचा संक्रमण कालावधी अनेक कुत्रे-मांजरींसाठी उपयोगी ठरू शकतो.
Ans: प्राण्याचे वय, आकार, वजन, शारीरिक गरजा आणि आरोग्यस्थिती लक्षात घेऊन अन्न निवडावे. विशेष आहाराची गरज असल्यास पशुवैद्यकांचा सल्ला घेणे योग्य.