Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी

South Indian Sambar Recipe: इडली, डोसा किंवा वडा यांच्यासोबत सांबार हा आवडीचा पदार्थ मानला जातो. डाळ, ताज्या भाज्या आणि योग्य मसाल्यांचा वापर केल्यामुळे सांबार चविष्ट आणि पोटभरीचं बनतं. काही सोप्या टिप्स लक्षात ठेवून घरच्या घरी हॉटेलसारखं स्वादिष्ट साऊथ इंडियन सांबार तयार करता येऊ शकतं.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 30, 2026 | 04:40 PM
South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इडली-डोश्यासोबत सांबारची चव खास
  • डाळ, भाज्या आणि मसाले हे मुख्य घटक
  • सोप्या पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारखं सांबार तयार करा
 

Homemade Sambar: इडली, डोसा किंवा गरमागरम वडा समोर आला की त्यासोबत सांबार नसेल तर मजाच येत नाही. दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये सांबारला वेगळंच स्थान आहे. डाळ, ताज्या भाज्या आणि मसाल्यांचा योग्य वापर केल्यामुळे त्याची चव तर छान लागतेच, पण ते पोटभरीचंही असतं. विशेष म्हणजे सांबार बनवण्यासाठी फार काही अवघड करण्याची गरज नसते. काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी हॉटेलसारखं स्वादिष्ट सांबार तयार करता येतं.

सांबारसाठी लागणारे साहित्य

  • एक कप तूर डाळ
  • दोन कप भाज्या
  • एक कांदा
  • दोन टोमॅटो
  • शेवग्याच्या शेंगा
  • गाजर
  • भोपळा
  • अर्धा कप चिंचेचा कोळ
  • गुळाचा छोटा तुकडा
  • दोन चमचे तेल किंवा तूप
  • एक चमचा मोहरी
  • अर्धा चमचा मेथीदाणे
  • पाव चमचा हिंग
  • दोन-तीन सुक्या लाल मिरच्या
  • कढीपत्त्याची पाने

मसाल्यासाठी

  • दोन ते तीन चमचे सांबार मसाला
  • अर्धा चमचा हळद
  • एक चमचा काश्मिरी लाल तिखट
  • आवश्यक मीठ

सांबार बनवण्याची सोपी पद्धत

सुरुवातीला तूर डाळ स्वच्छ धुवून साधारण १५ ते २० मिनिटे पाण्यात ठेवावी. नंतर डाळ कुकरमध्ये घेऊन त्यात हळद, थोडं मीठ आणि तीन कप पाणी घालावं. कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून डाळ अगदी मऊ शिजवून घ्या. आता दुसऱ्या पातेल्यात थोडं तेल गरम करा. त्यात कांदा, टोमॅटो आणि निवडलेल्या भाज्या टाका. दोन-तीन मिनिटे सर्व भाज्या हलक्या हाताने परतून घ्या. त्यानंतर त्यात एक कप पाणी आणि थोडं मीठ घालून झाकण ठेवावं. भाज्या पूर्ण मऊ होईपर्यंत त्या शिजू द्या. South Indian Sambar Recipe:

भाज्या शिजल्यानंतर त्यात चिंचेचा कोळ, सांबार मसाला, काश्मिरी तिखट आणि गुळाचा तुकडा मिसळा. हे मिश्रण काही मिनिटे उकळू द्या. चिंचेची आंबट चव आणि गुळाची हलकी गोडी सांबारला खास स्वाद देते. यानंतर शिजलेली डाळ नीट घोटून भाज्यांमध्ये मिसळा. सांबार जास्त घट्ट झालं असेल तर थोडं गरम पाणी घालून त्याला योग्य घट्टपणा द्या. आता मंद आचेवर सात-आठ मिनिटे सांबार उकळू द्या. या वेळेत मसाले आणि डाळीची चव व्यवस्थित एकत्र येते.

शेवटी फोडणी तयार करा. छोट्या कढईत तेल किंवा तूप गरम करून मोहरी आणि मेथीदाणे टाका. ते तडतडल्यावर हिंग, सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला. तयार फोडणी लगेच सांबारमध्ये ओता आणि पातेल्यावर दोन मिनिटे झाकण ठेवा. आता सुगंधी आणि झणझणीत सांबार तयार आहे. गरम इडली, डोसा, मेदू वडा किंवा साध्या भातासोबत ते वाढा. घरच्यांना ही चव नक्कीच आवडेल.

Web Title: South indian sambar recipe make hotel style delicious sambar at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • lifestlye tips
  • Marathi News
  • south Indian dish

संबंधित बातम्या

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?
1

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?

Chandrapur News: खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दा ऐरणीवर
2

Chandrapur News: खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दा ऐरणीवर

Bharti Singh Gets Emotional on Raksha Bandhan: राखी बांधताना भारती झाली भावुक; पापाराझीच्या गिफ्टने अश्रू अनावर
3

Bharti Singh Gets Emotional on Raksha Bandhan: राखी बांधताना भारती झाली भावुक; पापाराझीच्या गिफ्टने अश्रू अनावर

Vasai News: वसई भाजपमध्ये ‘बॅनर वॉर’; दहीहंडीच्या बॅनरवरून नगरसेवक आमनेसामने
4

Vasai News: वसई भाजपमध्ये ‘बॅनर वॉर’; दहीहंडीच्या बॅनरवरून नगरसेवक आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.