शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील 'या' वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन
निरोगी राहण्यासाठी जसे अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे, तितकेच पाणी पिणे सुद्धा आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. अनेक लोक तहान लागेल तेव्हा पाणी पितात तर काही लोक तहान भागवण्यासाठी पाच पाच मिनिटांनी पाणी पितात. पण केवळ तहान भागवण्यासाठी नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पण अनेक लोक चुकीच्या वेळी पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय अनेकांना सकाळी उठल्यानंतर उपाशी भरपूर पाणी पिण्याची सवय असते. पण जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो, रक्तभिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात.(फोटो सौजन्य – istock)
पाण्याचे सेवन करताना कायमच योग्य प्रमाणात पाणी प्यावे. अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. आयुर्वेदामध्ये पाण्याला विशेष महत्व आहे. पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन कमी होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला दिवसभरात कोणत्या वेळी पाणी प्यायल्यामुळे शरीराला फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दिवसभरात या वेळांमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे मानले जाते.
आयुर्वेदामध्ये सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानले जाते. उपाशी पोटी पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि पोट स्वच्छ होते. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे पोट साफ होते. याशिवाय शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते आणि त्वचा चमकदार, ग्लोइंग दिसू लागते. याशिवाय पाण्यात तुम्ही लिंबू किंवा मध मिक्स करून सुद्धा पिऊ शकता.
जेवणाच्या अर्धा तास आधी पाण्याचे सेवन केल्यास पचनक्रियेवर चांगले परिणाम दिसून येतात. पण जेवणाआधी भरपूर पाण्याचे सेवन करू नये. यामुळे पचनक्रिया मंदावते. जास्त पाण्याचे सेवन केल्यामुळे पाचक रसांची तीव्रता कमी होते, ज्यामुळे पचनक्रियेवर गंभीर परिणाम दिसून येतात. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात.
अनेकांना अंघोळीला जाण्याआधी पाणी पिण्याची सवय असते. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते.यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि हृदयावर जास्तीचा तणाव येत नाही. याशिवाय शरीराचे तापमान अचानक जास्त होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये व्यायाम करण्याआधी पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.
पाणी पिण्याची योग्य वेळ:
सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास पाणी प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि पचनक्रिया सुधारते. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि जास्त खाणे टाळता येते.
पाणी पिण्याची योग्य पद्धत:
पाणी नेहमी बसून प्यावे.पाणी घोट-घोट करून प्यावे, एकाचवेळी गटागट पाणी पिऊ नये.गरम किंवा कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते, विशेषतः सकाळी.थंड पाणी पिणे टाळावे, विशेषतः सकाळी आणि जेवणानंतर.
पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी?
दिवसभर थोडे-थोडे पाणी पीत राहा, तहान लागल्यावर लगेच पाणी प्या, एकाचवेळी जास्त पाणी पिणे टाळा, गरोदरपणात आणि आजारपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी प्या.