काही मिनिटांमध्ये होईल पोट स्वच्छ! रात्रीच्या जेवणानंतर करा 'या' पदार्थाचे सेवन
दैनंदिन आहारात सतत बाहेरील आणि तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. मात्र चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे पोटात वाढलेल्या वेदना, अपचन किंवा पोटातील गॅस इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. यामुळे शरीर स्वच्छ होत नाही. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे पोटात गॅस होणे, अपचन किंवा आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. शरीरात तसेच साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर अनेकांचे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरते. त्यामुळे शरीरात बद्धकोष्ठतेसंबंधित दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता शरीराकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आहारात बडीशेपचे सेवन कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. बडीशेप खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले घटक शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत करतात.
जेवणानंतर नियमित बडीशेप खावी. यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. बडीशेपमध्ये एनेटोल नावाचा घटक आढळून येतो. ज्यामुळे पचनसंस्थेचे काम सुरळीत चालू राहते. याशिवाय यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करतात. आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस कमी करण्यासाठी बडीशेप खावी. यासाठी रात्री जेवण झाल्यानंतर १ किंवा अर्धा चमचा बडीशेप खावी. यामुळे सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होईल.
झोपेची गुणवत्ता बिघडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात बडीशेप खावी. बडीशेपमध्ये असलेले मॅग्नेशियम झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करते. याशिवाय अर्धा चमचा बडीशेप किंवा बडीशेपचे पाणी प्यायल्यामुळे मन शांत राहते, स्नायूंना आराम मिळतो आणि गाढ झोप लागते.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बडीशेपचे पाणी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी बडीशेपचे पाणी प्यावे. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बडीशेप टाकून रात्रभर पाणी तसेच ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर उपाशी पोटी पाण्याचे सेवन करावे. यामुळे क्षणार्धात आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि पोट स्वच्छ होण्यास मदत होईल.