हृदयाला सूज आल्यानंतर शरीरात दिसू लागतात 'ही' भयानक लक्षणे
धावपळीची जीवनशैली जगताना आरोग्यासंबंधित समस्यांचा प्रत्येक व्यक्तीला सामना करावा लागत आहे. कधी पोटासंबंधित समस्या तर कधी हृद्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्या आहेत. हल्ली हृदयाच्या समस्यांनी अनेक लोक त्रस्त आहेत. अचानक येणारा हार्ट अटॅक, स्ट्रोक, हार्ट ब्लॉकेज इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागल्या आहेत. या समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे हृदयाला सूज येणे. हृदयाला आलेली सूज आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. ही समस्या कोणत्याही वयात उद्भवू शकते. त्यामुळे शरीरात आरोग्यासंबंधित दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपाय करावे. हृद्यासंबंधित उद्भवणाऱ्या या स्थितीला मायोकार्डिटिस असे म्हणतात.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात दिसणारी ‘ही’ लक्षणे देतात निरोगी आरोग्याचे संकेत, कायमच राहाल फिट आणि हेल्दी
निरोगी आरोग्यासाठी हृदयाचे कार्य सुरळीत असणे आवश्यक आहे. कारण हृदयाच्या कार्यात अडथळे आल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते आणि आरोग्यासंबंधित अनेक आजार उद्भवू लागतात. मायोकार्डिटिस या स्थितीमध्ये हृदयाच्या स्नायूंना आणि नसांना सूज येण्याची शक्यता असते. यामुळे हृद्य योग्यरित्या रक्त पंप करत नाही. रक्त पंप करू न शकल्यामुळे हृदयाच्या कार्यात गुंतागुंती वाढते, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. तर काही वेळा परिस्थिती अतिशय गंभीर होऊन जाते, ज्यामुळे शरीराच्या इतर भागांपर्यंत रक्त पोहोचने कठीण होते. आज आम्ही तुम्हाला हृदयाला सूज आल्यानंतर शरीरात कोणती गंभीर लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
पोटात वारंवार गॅस होतो? जाणून घ्या या मागील प्रमुख कारण आणि घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम
शरीरात हृद्यासंबंधित दिसून येणाऱ्या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. यामुळे शरीराला हानी पोहचते. हृदयाचे स्नायू किंवा बाह्य थराला सूज आल्यानंतर शरीरात गंभीर लक्षणे दिसू लागतात. याला मायोकार्डिटिस किंवा पेरीकार्डिटिस असे म्हणतात.सामान्यतः ही समस्या शरीरात विषाणू, संसर्ग किंवा हानिकारक पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे उद्भवते. याशिवाय हृदयाची क्षमता कमी झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. बऱ्याचदा सर्दी, खोखला किंवा कोरोना सारख्या जीवघेण्या आजारामुळे सुद्धा अशी स्थिती उद्भवते. पोटात वाढलेला गॅस किंवा शरीरात निर्माण झालेलीचिंता तणाव वाढल्यानंतर हृदयाला सूज येण्याची जास्त शक्यता असते.